Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वैदेही वाढान यांच्याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली मोठी जबाबदारी

 

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई  दि,१० मार्च : पालघर जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्य आणि माजी अध्यक्षा वैदेही वाढान यांच्याकडे शिव सेना पक्षाने (शिंदे गट) पालघर डहाणू विधानसभा महिला जिल्हा प्रमुख पदाची मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मुंबईत एका कार्यक्रमात स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वैदेही वाढान यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी पालघरचे खासदार राजेंद्र गावित, आमदार रवींद्र फाटक, जिल्हाप्रमुख राजेश शहा, प्रभाकर राऊळ आदी मान्यवर उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

वैदेही वाढाण यांच्याकडून जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची सूत्रे काढून घेतल्यानंतर पक्ष त्यांना कोणती नवी जबाबदारी देते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र शिवसेने मधील फुटी नंतर वाढान यांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने उभे राहणे पसंत केले. त्यामुळे शिंदे यांच्या प्रति निष्ठा व्यक्त केल्यामुळे त्यांना जिल्हा महिला प्रमुख पदाची मोठी जबाबदारी देण्यात आल्याचे बोलले जात आहे.

त्यामुळे आता जिल्ह्यात ठाकरे गटाकडून महिला जिल्हा प्रमुख पदावर कोणाची वर्णी लागणार याकडे ही सर्वांचे लक्ष लागले आहे. वैदेही वाढाण यांच्यासारख्या तरुण तडफदार आणि अभ्यासू महीला शिव सैनिकाला महिला जिल्हा प्रमुख पदाची मोठी जबाबदारी मिळाल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

हे देखील वाचा,

 

 

 

Comments are closed.