चार राज्यांमधून आलेल्या प्रवाशांसाठी जिल्ह्यात दाखल झाल्यानंतरच्या कोविड मार्गदर्शक सुचना.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
गडचिरोली, दि. 25 नोव्हेंबर: गडचिरोली जिल्हयात कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी मानक कार्यप्रणाली (SOP) घरगुती विमान प्रवाश्यांसाठी (Domestic Air Travel) कार्यान्वित करण्यात आले आहे. दिल्ली (एनसीआरसह), राजस्थान, गुजरात आणि गोवा या राज्यामधील विमानतळांवरुन प्रवास करणारे तेथील सर्व स्थानिक प्रवाश्यांना कोरोना चाचणी अहवाल (RTPCR टेस्ट रिपोर्ट) सोबत बाळगणे अनिवार्य असेल. तसेच प्रवासापूर्वी व प्रवासानंतर विमानतळावर दाखविणे बंधनकारक असेल. विमानतळ प्राधिकरण यांना प्रवासापूर्वी प्रवाश्यांचे कोरोना चाचणी अहवाल पडताळणी करणे बंधनकारक राहील. घरगुती हवाई प्रवाश्यांना (Domestic Air Travel) RTPCR चाचणी अहवाल विमानतळांवर उतरण्याच्या नियोजित वेळेच्या 72 तासांच्या आत झालेला असावा.
RTPCR चाचणी अहवाल नसलेल्या विमान प्रवाश्यांना वरील अटी 1 आणि 2 मधील बाबी पूर्ण न केल्यास त्यांना संबंधित विमानतळावर स्वखर्चावर RTPCR तपासणी करणे अनिवार्य राहणार. याकरीता विमानतळ प्रधिकरणाने RTPCR चाचणी केंद्राची व्यवस्था करुन प्रवाश्यांकडून चाचणीसाठी थेट शुल्क आकारण्यास मुभा राहील.विमानतळावर चाचणी झाल्यानंतरच प्रवाशांना घरी जाण्याची परवानगी असेल. मात्र प्रवाश्यांना त्यांचे संपर्क क्रमांक व घरचा पत्ता देणे बंधनकारक राहील. सबंधित प्रवाश्यांचे अहवाल सकारात्मक (Positive) आल्यास संपर्क तपासणी (Contact Tracing) करिता तपासणीचे वेळेस सदर तपशील सर्व प्रवाश्यांकडून विमानतळावर घेण्यात येईल. विमानतळावर ज्या प्रवाश्यांचा अहवाल सकारात्मक येईल त्यांना कोविड19 प्रोटोकॉलप्रमाणे उपचार /वागणूक दिली जाईल.वरिल मानक प्रणाली /मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे अंमलबजावणीसाठी संबंधीत तहसिलदार हे नोडल अधिकारी असतील व याबाबत वेळोवेळी खात्री करतील.
रेल्वे प्रवाश्यांसाठी (Railways)
दिल्ली (एनसीआरसह), राजस्थान, गुजरात आणि गोवा याराज्यांमधून रेल्वेने जिल्ह्यात येणारे/ दाखल होणारे मुळ प्रवासी किंवा रेल्वेस्थानकात मुक्कामी/थांबा असणाऱ्या सर्व प्रवाश्यांना रेल्वेव्दारे जिल्ह्यात येणारे सर्व प्रवाश्यांना RTPCR (नकारात्मक) तपासणी अहवाल आपल्या समवेत बाळगणे बंधनकारक राहील.रेल्वेव्दारे जिल्ह्यात दाखल होणाऱ्या प्रवाश्यांना 96 तास पूर्वी कोरोना चाचणी नकारात्मक अहवाल (RTPCR Test) सोबत बाळगणे बंधनकारक राहील.3) RTPCR चाचणी नकारात्मक अहवाल नसलेल्या प्रवाश्यांचे रेल्वे स्थानकावर शरीराचे तापमान व कोविड-19च्या लक्षणांची तपासणी करण्यात येईल. कोविड-19 चे लक्षणे नसलेल्या प्रवाशांना रेल्वे स्थानकातून घरी जाण्याची परवानगी दिली जाईल.
कोविड19 ची लक्षणे असलेल्या प्रवाश्यांची अँटिजेन तपासणी करण्यात येईल. तसेच अँटिजेन तपासणी अहवासल नकारात्मक आल्यानंतर प्रवाश्यांना घरी जाण्याची परवानगी राहील.
कोविड19 तपासणी न केलेल्या/ सकारात्मक आढळलेल्या प्रवाश्यांना पूढील काळजी घेण्यासाठी कोविड केअर सेंटर (CCC) येथे पाठविण्यात येईल. तसेच CCC मध्ये दाखल करण्यात आलेल्या प्रवाश्यांना CCC वरील सर्व खर्च स्वत: अदा करावा लागेल. वरिल मानक प्रणाली/ मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे अंमलबजावणीसाठी संबंधीत तहसिलदार हे नोडल अधिकारी असतील व याबाबत वेळोवेळी खात्री करतील.
रस्ते वाहतूक प्रवाश्यांसाठी (Road Travel)
दिल्ली (एनसीआरसह), राजस्थान, गुजरात आणि गोवा या राज्यामधून रस्ते मार्गाने जिल्ह्याच्या सिमेत येणाऱ्या/दाखल होणाऱ्या प्रवाश्यांचे शरीराचे तापमान व कोविड19चे लक्षणे असल्याची तपासणी इत्यादी बाबींची नियोजन / व्यवस्था करण्याची जबाबदारी जिल्हा शल्यचिकित्सक/जिल्हा आरोग्य अधिकारी यांची राहील.कोविड-19चे लक्षणे नसलेल्या प्रवाश्यांना जिल्ह्यात दाखल होण्याची परवानगी देण्यात येईल.परंतु कोविड19 च्या लक्षणेअसलेल्या प्रवाश्यांना परत त्यांच्या मुळ ठिकाणी/ घरी जाण्याचा पर्याय देण्यात येईल.
कोविड19 तपासणी न केलेल्या /सकारात्मक आढळलेल्या प्रवाश्यांना पूढील काळजी घेण्यासाठी कोविड केअर सेंटर (CCC) येथे पाठविण्यात येईल. तसेच CCC मध्ये दाखल करण्यात आलेल्या प्रवाश्यांना CCC वरील सर्व खर्च स्वत: अदा करावा लागेल.
शासन निर्देशाप्रमाणे कोविड – 19 साथरोग अंतर्गत गडचिरोली जिल्हा सीमाक्षेत्रामध्ये (कंटेनमेंट झोन वगळून) विमान, रेल्वे आणि रस्ते वाहतूक मार्गाने प्रवास करुन जिल्हयात दाखल होणाऱ्या प्रवाश्यांना परिशिष्ट-अ मधील तरतुद/निर्बंध दिनांक 25.11.2020 पासून लागू करण्यात येत आहे. संलग्नित मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे सर्व संबंधितांना बंधनकारक असेल.
Comments are closed.