नागपूर मनपात ५६२ कोटींचा पाणी घोटाळा…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नागपूर, दि. ५ डिसेंबर : गत आठ वर्षांमध्ये नागपूर महानगरपालिकेला पाणीपुरवठा कंत्राटामध्ये तब्बल ५६२ कोटी २६ लाख रुपयांचा तोटा झाला आहे. ओसीडब्ल्यू कंपनीला पाणीपुरवठ्याचे कंत्राट देण्यापूर्वी नागपूर मनपा पाणीपुरवठ्यात नफ्यामध्ये होती. ५६२ कोटींचा तोटा सहन कराव्या लागलेल्या ओसीडब्ल्यू कंपनीच्या कंत्राटाची तक्रार विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे करण्यात आली आहे.
ओसीडब्ल्यूला कंत्राट दिल्यामुळे नागपूर मनपाला २०१२-१३ पासून दरवर्षी तोटा सहन करावा लागत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. ओसीडब्ल्यूला पाणीपुरवठा व देखभालीचे कंत्राट देण्यापूर्वी २०१०-११ मध्ये नागपूर मनपा ३ कोटी रुपयांनी फायद्यात होती. परंतु ओसीडब्ल्यूला कंत्राट दिल्यापसून दरवर्षी तोटा वाढत गेला आहे. २०१२-१३ मध्ये नदी व धरणातून पाणी उचलीवर १२ कोटी ६६ लाख रुपये खर्च करण्यात आले. त्या पाण्यावर प्रक्रिया करण्याकरिता विद्युत बिलावर ५१ कोटी १३ लाख देयक भरण्यात आले. तर ओसीडब्ल्यूला देखरेखीकरिता ७९ कोटी ३१ लाख आणि टँकर पुरवठ्यावर ७ कोटी ६८ लाख रुपये असे एकत्र खर्च १५० कोटी ७८ लाख रुपये करण्यात आला. तर नागरिकांकडून पाणीपट्टीपोटी ९४ कोटी २६ लाख रुपयांची वसुली करण्यात आली. त्यामुळे नागपूर मनपाला ५६ कोटी ५२ लाखांचा तोटा सहन करावा लागला.
याप्रमाणे २०१३-१४ मध्ये एकूण खर्च १५९ कोटी ८७ लाख रुपये आणि पाणीकर वसुली ९८ कोटी ८ लाख रुपये झाल्याने ६१ कोटी ७९ लाख रुपयांचा तोटा, २०१४-१५ मध्ये एकूण खर्च १७३ कोटी २४ लाख रुपये व पाणीकर वसुली १०४ कोटी ४२ लाख रुपये आणि तोटा ६८ कोटी ८२ लाख रुपये, २०१५-१६ मध्ये एकूण खर्च १८० कोटी ८५ लाख रुपये व पाणीकर वसुली १११ कोटी ७६ लाख रुपये आणि तोटा ६९ कोटी ९ लाख रुपये, २०१६-१७ मध्ये एकूण खर्च १९८ कोटी ५ लाख रुपये आणि पाणीकर वसुली १२५ कोटी १८ लाख रुपये आणि तोटा ७२ कोटी ८७ लाख रुपये, २०१७-१८ मध्ये एकूण खर्च १९३ कोटी ६१ लाख रुपये व पाणीकर वसुली १३४ कोटी ८ लाख रुपये आणि तोटा ५९ कोटी ५३ लाख रुपये, २०१८-१९मध्ये एकूण खर्च २११ कोटी ७७ लाख रुपये व पाणीकर वसुली १४२ कोटी ४४ लाख रुपये आणि तोटा ६९ कोटी ३३ लाख रुपये, २०१९-२० मध्ये एवूâण खर्च २४९ कोटी ६६ लाख व पाणीकर वसुली १४५ कोटी ३८ लाख आणि तोटा १०४ कोटी २७ लाख असा एवूâण तोटा ५६२ कोटी २६ लाख रुपये झाला आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मनपा गटनेते वेदप्रकाश आर्य यांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे तक्रार केली आहे.
Comments are closed.