सलमान खान झाला आहे सेल्फ क्वॉरंटाईन, ड्रायव्हरसह स्टाफ मेंबर्सना कोरोनाची लागण.
बॉलिवूडचा दंबंग सलमान खानच्या ड्रायव्हर अशोक सह दोन स्टाफ मेंबर्सनाही कोरोनाची लागण झाली आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क :– कोरोना व्हायरसने अख्या जगाला विळखा घातला आहे. संपूर्ण जगभरात लाखो लोकांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. अशातच भारतातही कोरोना वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या विळख्यात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीही अडकले होते. अशातच बॉलिवूडचा दंबंग सलमान खानच्या ड्रायव्हरसह दोन स्टाफ मेंबर्सनाही कोरोनाची लागण झाली आहे. असं सांगण्यात येत आहे की, ड्रायव्हर अशोकला कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झाल्यानंतर अभिनेता सलमान खानने स्वतःला क्वॉरंटाईन केलं आहे.
सलमान खान आता 14 दिवसांसाठी क्वॉरंटाईन राहणार आहे, असं सांगण्यात येत आहे की, त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला सेल्फ आयसोलेशनमध्ये राहण्यासाठी सांगितलं आहे. तसेच सलमानचा ड्रायव्हर आणि इतर स्टाफ मेंबर्स ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे, त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
सलमान खान बिग बॉस-14 या शोचं सूत्रसंचलन करत होता. अशातच आता बिग बॉसच्या येणाऱ्या एपिसोडसाठी सलमान हजेरी लावणार का? यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
Comments are closed.