ब्रेंकिंग: सिरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला आग
आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
पुणे डेस्क, दि. २१ जानेवारी: कोरोना प्रतिबंधक ‘कोव्हिशिल्ड’ लसीमुळे सध्या चर्चेत असणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये भीषण आग लागली आहे. सीरम इन्स्टिट्यूटमधील एका इमारतीच्या तिसर्या मजल्यावर ही आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. अग्निशमन दलाचे वरिष्ठ अधिकारीदेखील घटनास्थळी रवाना झाले आहेत.
कोव्हिशिल्ड लसीच्या वापरासाठी परवानगी देण्यात आलेली असून सध्या देशभरात लसीकरणास सुरु आहे. मांजरी येथील याच ठिकाणी लसीचं उत्पादन केलं जात होतं. ज्या इमारतीमध्ये आग लागली आहे तेथून जवळच प्रोडक्शन प्लांट आहे. आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून मोठ्या प्रमाणात आगीचे लोट दिसत आहेत. यामुळे घटनास्थळी लोकांनी गर्दी केली आहे.
Comments are closed.