Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

घुग्गुस शहराजवळील वर्धा नदीत बुडून तीन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर डेस्क २२ नोव्हें :- घुग्गुस शहराजवळील चिंचोली घाट येथे वर्धा नदीत बुडून तीन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाला. आज सकाळी पाच जण नदीवर आंघोळीसाठी गेले होते. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने तिघे पाण्यात बुडाले. तर दोघे जणही पाण्याचा अंदाज न आल्याने खोल गेले. मात्र, हे दोघे सुदैवाने वाचले आहेत.

तिघे बुडाल्याची माहिती मिळताच गावात शोककळा पसरली आहे. पृथ्वीराज आसुटकर, प्रेम गेडाम आणि प्रचन वानखेडे अशी बुडालेल्या मुलांची नावे असून ही मुले १५ ते १६ वर्ष वयोगटातील आहे. आज सकाळी आमराई वॉर्ड परिसरात पाच मुलं नदीवर आंघोळीसाठी गेली. मात्र नदी पात्रात उतरल्यानंतर खोलीचा अंदाज न आल्याने तीन जण बुडाले तर दोघांना वाचविण्यात यश आहे. दरम्यान, पोलिसांकडून याप्रकरणाचा शोध घेण्यात येत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.