नववर्षाच्या पहिल्याच दिवशी एका वाघिणिसह दोन बछड्याचे म्रूतदेह आढळून आल्यानेज्यामुळे वन विभागात खळबळ.
मृत जनावराच्या मासात विष टाकून ठेवले असावे ते मास वाघांने खाताच मृत झाल्याचा अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी केला व्यक्त
उमरेड करंडला अभयारण्यातील घटना .
नागपूर डेस्क ०२ जानेवारी :- उमरेड करंडला अभयारण्यात नववर्षाच्या पहिल्याच दिवशी एका वाघिणिसह तिच्या दोन बछड्याचे म्रूतदेह आढळून आले. ज्यामुळे वन विभागात खळबळ उडालेली आहे. विष देवून या वाघांना ठार मारण्यात आले असावे असा अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
या प्रकरणात एका व्यक्तीला संशयावरून अटक करण्यात आलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून उमरेड कराडला अभयारण्यात एक वाघीण व तीचे दोन बछडे वावरत होते. त्यांना पाहण्यासाठी अभयारण्यात पर्यटकांची गर्दी वाढलेली होती. शुक्रवारी सांयकाळी गस्त घालत असलेल्या वनरक्षकांना वाघीनीसह तीचे बछडे म्रूतावस्ततेत दिसले. जवळपास शेत असल्यामुळे शेताजवळच अर्धवट खाल्लेला एका प्राण्याचा म्रूतदेह सापडला.
Comments are closed.