भारताने या सामन्यात ऑस्ट्रेलियापुढे विजयासाठी ३०३ धावांचे आव्हान ठेवले होते.
भारताने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात १३ धावांनी विजय मिळवला.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
भारताने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत करत ऐतिहासिक विजयाची नोंद केली. भारताला गेल्या सहा सामन्यांमध्ये मिळालेला हा पहिला विजय आहे. भारताने या सामन्यात ऑस्ट्रेलियापुढे विजयासाठी ३०३ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना आरोन फिंच आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी अर्धशतके झळकावली, पण त्यांना संघाला विजय मिळवून देता आला नाही. भारताने या सामन्यात १३ धावांनी विजय मिळवला. भातीय संघाचा ऑस्ट्रेलियाच्या दौऱअयातील हा पहिला विजय आहे.

भारताच्या ३०३ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला तो पदार्पण करणाऱ्या टी. नटराजनने. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर मार्नस लॅबुशेनला नटराजनने बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले. ऑस्ट्रेलियाला यावेळी सर्वात मोठा धक्का दिला तो या सामन्यात प्रथम खेळणारा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने. या संधीचे सोने शार्दुलने केले आहे. कारण भारतासाठी डोकेदुखी ठरलेल्या स्टीव्हन स्मिथला शार्दुलने फक्त सात धावांवर बाद केले आहे. यापूर्वी झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये स्मिथने शतके झळकावली होती. त्यामुळे शार्दुलने यावेळी भारताला मोठे यश मिळवून दिले.
Comments are closed.