मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये फायनलाचा सामना रंगणार आहे.
दिल्लीचा संघ प्रथमच आयपीएलच्या इतिहासात फायनलमध्ये.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या मोसमात क्वालिफायर 2 सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स हैदराबादचा धावांनी पराभव केला. आयपीएलच्या इतिहासात दिल्ली कॅपिटल्सने पहिल्यांदाचं फायनलमध्ये धडक मारली आहे. शिखर धवनच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर दिल्लीने 20 षटकात 189 धावांचे लक्ष्य उभारले होते. प्रत्त्युतरात सनरायझर्स हैदराबादचा संघ 172 धावापर्यंतचं मजल मारु शकला.

केन विल्यमसनने 45 बॉलमध्ये 67 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 5 फोर आणि 4 सिक्स मारले. त्याआधी कॅगिसो रबाडाने कर्णधार डेव्हिड वॉर्नरला आऊट केले. त्याने 3 बॉलमध्ये 2 रन केले. पाचव्या ओव्हरमध्ये प्रियाम गर्ग (17) आणि मनीष पांडे (21) यांना मार्कस स्टॉयनिसने बाद केले. जेसन होल्डर अकबर पटेलच्या बॉलवर 11 रनवर आऊट झाला.
दिल्लीकडून शिखर धवनने 78 रन केले. शेवटी शिमरॉन हेटमायरने नाबाद 42 रनची खेळी केली. मार्कस स्टोइनिसने 38 आणि श्रेयस अय्यरने 21 रन केले. ऋषभ पंत 2 रनवर नाबाद राहिला. हैदराबादकडून संदीप शर्मा, जेसन होल्डर आणि राशिदने एक-एक विकेट घेतली.
Comments are closed.