Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मुंबईतील शाळा थेट पुढच्या वर्षी होणार सुरु?

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. २० नोव्हेंबर :- मुंबईतील कोरोनाबाधितांचा पुन्हा वाढणारा आकडा लक्षात घेता मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शहरातील वाढता संसर्ग लक्षात घेता मुंबईत शाळा सुरु होणार नाहीत, असे आदेश मुंबई महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. या आदेशांप्रमाणे, येत्या ३१ डिसेंबरपर्यंत मुंबईतील शाळा बंदच ठेवण्यात येतील. खरंतर,राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने येत्या सोमवारपासून राज्यातील नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, आयुक्तांच्या आदेशांनुसार मुंबईत या वर्षा अखेरपर्यंत शाळा बंदच राहतील.

राज्यातील कोरोनाची स्थिती जरी नियंत्रणात असली तरी येत्या काळात कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे, विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महापालिका प्रशासनाने या वर्षाअखेरपर्यंत म्हणजे ३१ डिसेंबरपर्यंत मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीत गेल्या काही दिवसांत अचानक वाढलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, काहीच वेळात पालिका प्रशासनाकडून परिपत्रकाद्वारे सविस्तर माहिती देण्यात येईल.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.