वयाच्या 83 व्या वर्षी असून माजी कर्मचार्याला भेटायला थेट पुण्यात आले होते.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
पुणे डेस्क 06 जानेवारी:- रतन टाटा हे त्यांच्या साधी राहणी व उच्च विचारांसाठी प्रसिद्ध आहेत, तसेच ते त्यांच्या दातृत्वा साठी देखील ओळखले जातात. टाटांच्या कंपनीत कार्य करणाऱ्या कर्मचार्यांना रतन टाटा कुटुंबियच मानतात. अशीच एक घटना समोर आली आहे. टाटा कंपनीत काम करणारे एक कर्मचारी गेल्या 2 वर्षांपासून आजारी आहेत. ही बातमी रतन टाटा यांना समजताच रतन टाटा यांनी पुणे येथील त्या आजारी कर्मचाऱ्याच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. विशेष म्हणजे ही भेट अत्यंत गोपनीय होती. मात्र भेट दिलेल्या कुटुंबियांच्या मित्राने सोशल मीडियावर पोस्ट करीत या भेटीबाबतची माहिती दिली आहे.
पुण्यातील फ्रेंड्स सोसायटी मधील आजारी कर्मचाऱ्याला भेटायला टाटा आले होते. 83 वर्षे वय असलेले टाटा भेटायला आल्याने कुटुंबीय देखील भारावून गेले होते. लॉक डाऊन च्या काळात कर्मचाऱ्यांची कपात करणाऱ्या कंपन्यांवरही रतन टाटा यांनी जोरदार टीका केली होती हे विशेष.
Comments are closed.