कुठल्या देशात घडला सिनेमासारखा प्रकार.. वाचा सविस्तर
वृत्तसंस्था, 2 जानेवारी: जाको राखे साईया…! मार सकेना कोई..! अशी आपल्याकडे हिंदीमध्ये म्हण आहे. म्हणजे नशीब बलवंत्तर असलं तर आपण मोठ्या संकटातूनही आपला जीव वाचवू शकतो असाच एक चमत्कार ऑस्ट्रियातील एका शहरात घडला आहे.
आपल्या जोडीदाराच्या प्रेमाचा होकार मिळवण्यासाठी विविध पद्धतीने प्रपोज करत असतात. आपल्या प्रेयसीच्या होकारासाठी काहीजण अगदी काहीही करायला तयार असतात. आपल्या जोडीदाराला प्रपोज करण्याच्या पद्धती देखील खूप विचित्र असतात. याआधी देखील तुम्ही अशी अनेक उदाहरणे पाहिली असतील. आपल्या जोडीदाराला प्रपोज केलेला क्षण खास ठरण्यासाठी अशी कृत्य अनेकजण करत असतात. परंतु ऑस्ट्रियातील एक असे प्रपोज प्रकरण आहे जे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल.
प्रेयसीला प्रपोज करण्यासाठी लोक अतरंगी प्रकार करतात. या पठ्ठ्याने डोंगरकड्यावर जाऊन प्रपोज केलं, पण तिथेच घात झाला. एखाद्या सिनेमात घडणाऱ्या चमत्कारासारखी, पण खरी गोष्ट तुम्हीच वाचा..
ऑस्ट्रियामध्ये एका तरुणाने एका युवतीला 650 फुटांवरील एका डोंगरकड्यावर रोमँटिकपणे प्रपोज केल्यानंतर तिनं लाजून ‘हो’ म्हटलं. पण त्यानंतर तिचा त्या उंच कड्यावरून पाय घसरून ती थेट 650 फूट दरीत कोसळली. तिला वाचवायला प्रियकरही धावला.
याविषयी मिळालेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रिया देशात कॅरिंथियामध्ये ही घटना घडली आहे. येथील 27 वर्षीय युवकाने आपल्या 32 वर्षीय गर्लफ्रेंडला प्रपोज केलं. मात्र, त्यानंतर ती पाय घसरून 650 फुटांवरुन कोसळली. 27 डिसेंबर रोजी ही युवती आपल्या बॉयफ्रेंड सोबत फॉल्कर्ट माऊंटनवर गेली होती. त्या ठिकाणी तिच्या बॉयफ्रेंडने तिला प्रपोज केलं. त्यानंतर काहीच वेळानंतर तिचा पाय घसरला आणि ती खाली कोसळली. परंतु या युवतीचे नशीब चांगलं असल्याने इतक्या उंचावरून पडूनही ती जिवंत राहिली. ती खाली कोसळल्यानंतर तिच्या प्रियकराने देखील तिला वाचवण्यासाठी खाली उडी मारली. पण तो 50 फूट खाली आल्यावर डोंगरातच अडकला. प्रेयसी थेट खाली बर्फावर पडली. नुकतीच बर्फवृष्टी झाल्याने भुसभुशीत बर्फ होता. त्यावरच ती पडली. त्यामुळे तिला फार लागलं नाही. त्यानंतर एका वाटसरूने तिला बर्फावर पडलेलं पाहिलं आणि प्रशासनास माहिती दिल्यानंतर तिचा जीव वाचला. सध्या युवती सुरक्षित असून तरुणाच्या मणक्याला मार लागला आहे.
Comments are closed.