Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

…पुन्हा नरभक्षक वाघाने घेतला एकाचा बळी

वडसा वनपरिक्षेत्रातील उसेगाव कक्ष क्रमांक 91 मधील घटना..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली 08 सप्टेंबर :-   वडसा शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या उसेगाव वन कक्ष क्रमांक 91 मध्ये पुन्हा वाघाने एका इसमावर हल्ला करून ठार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे .

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

वाघांच्या हल्ल्यात ठार झालेल्या इसमाचे नाव प्रेमलाल तुकाराम प्रधान (४५) असून उसेगाव येथील रहिवासी आहे.

वडसा वनाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून मृतक इसम प्रेमलाल हा कक्ष क्रमांक 91 मध्ये मशरूम आणण्यासाठी जंगलात जाऊन मशरूम गोळा करीत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्यावर झडप घालून काही अंतरापर्यंत फरफटत नेऊन ठार केल्याची धक्कादायक माहिती दिली असून घटनास्थळी उपवनसंरक्षक धनंजय वाडीभिसे , सहाय्यक वनाधिकारी मनोज चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी विजय धांडे आणि संपूर्ण वन कर्मचाऱ्यांची टीम दाखल होऊन मोका पंचनामा करून पोलीस विभागाला पाचरण करण्यात आले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मृतकाच्या परिवाराला अंत्यविधी करिता वन विभागाच्या अधिकाऱ्यामार्फत वीस हजार रु. सानुग्रह निधी उपलब्ध करून देत वृत्तदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय वडसा येथे पाठवण्यात आले आहे. घटनेचा अधिक तपास वन कर्मचारी, वडसा पोलीस करीत आहेत.

वनविभाग वेळोवेळी जनजागृती करीतअसताना ही नागरिकांचे अक्षम्य दुर्लक्ष.. 

वन विभागाने वाघाच्या वाढत्या हल्ल्यामुळे प्रत्येक गावात जनजागृती सुचना  वाघाचे अस्तित्व असल्याचे फलकही लावून असतानाही नागरिक जडाऊ सरपण तसेच जंगलात मिळणाऱ्या कंदमुळे, मोहफुल , मशरूम यासाठी जंगलात जात असल्याने अशा दुर्दैवी दुर्घटना घडत असतानाही नागरिक पुन्हा पुन्हा वनात जात आहेत. आता तरी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वनात जाणे टाळावे असे वन विभागा मार्फत आवाहन करण्यात येत आहे.

याशिवाय वडसा ,गडचिरोली वन विभागात वाघांचे हल्ले दिवसेंदिवस वाढत असल्याने वनविभागाने नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यासाठी ताडोबा येथून शार्पशूटर नियुक्ती केली असून वाघावर पाळत ठेवलेली आहे नागरिकांनीही सहकार्य करावे जेणेकरून लवकरच नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यात यश प्राप्त होईल असे  वनविभागामार्फत बोलले जात आहे .

 

हे देखील वााचा , 

Comments are closed.