Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राज्यात पाच ते सहा दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा उपलब्ध आहे – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

विजय साळी (जालना), लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

जालना, दि. ८ डिसेंबर: कोरोना काळात राज्यातील रुग्णालयामध्ये रक्ताची टंचाई भासत असून नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने पुढे येऊन रक्तदान करावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले असून त्या आवाहनास प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिर आयोजित केले जात आहेत, महाविद्यालयातील युवा वर्ग हा रक्तदानासाठी महत्वाचा घटक आहे, मात्र कोरोना मुळे महाविद्यालय बंद आहेत याचा परिणाम रक्तदानावर होत आहे आणि रक्तसंकलनामध्ये अडचणी येत आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

त्या अनुषंगाने राज्यातील रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रक्तदान शिबिरं घेण्यासंदर्भात जयंत पाटील यांना पत्र लिहिलं असून या रक्तदान शिबिरातुन मोठ्या प्रमाणात रक्ताचा पुरवठा होईल असा विश्वास देखील टोपे यांनी व्यक्त केला. राज्यात 5 ते 6 दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा सध्या शिल्लक असून रक्तदान वाढवणं गरजेचं असल्याचं देखील टोपे म्हणाले. आरोग्यमंत्री राजेश टोपे आज जालना जिल्हाधिकारी कार्यालयात आले असतांना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देतांना त्यांनी माहिती दिली.

EXCLUSIVE पाहा समृध्दी चे वीज चोर कंत्राटदार.
समृध्दी महामार्गाच्या कामासाठी कंत्राटदाराकडून विजेची चोरी

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.