Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

त्या…अकरा जणांचा बळी घेणाऱ्या वाघाला जेरबंद करण्याचे गडचिरोली वनवृत्ताचे वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर यांनी दिले आदेश

  • 8लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
त्या.. अकरा जणांचा बळी घेणाऱ्या वाघाला जेरबंद करण्याचे गडचिरोली वनवृत्ताचे वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर यांनी दिले आदेश
गडचिरोली दी 04 सेप्टेंबर 2021 :- गडचिरोली वनवृत्तात असलेल्या गडचिरोली व वडसा वनविभागात मानव वन्यजीव संघर्ष निर्मांण झाला असून वाघाने धुमाकूळ घातला आहे.  आतापर्यंत 11 लोकांचा बळी घेतल्याने मोठी दहशत निर्माण झाली असल्याने शेतकरी आपल्या शेतात जाण्यास धजावत नाही आहेत तर काही शेतकऱ्यांनी वाघाच्या दहशतीमुळे शेतकऱयांनी शेतीच केली नाही.आधीच कोरोना संसर्गाने रोजगार हिरावला आहे तर दुसरीकडे वाघाच्या दहशतीमुळे शेतकऱयांचे कामात खोळंबा निर्माण झाला आहे. याशिवाय शेतकऱ्यांना दुसरा रोजगार मिळत नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. वाघाचं हल्ले करून शेतमजुरासह पाळीव जनावराचे फडशा फाडल्याने  जंगला शेजारी असलेल्या शेतकरी हवालदिल होण्याची पाळी आली आहे.  यासंदर्भात वेळोवेळी वनविभाग कार्यालयाला नागरिकांनी निवेदन देवून वाघाचे बंदोबस्त करण्याची मागणी  नागरिकांच्या वतीने वडसा , गडचिरोली या  दोनही वनविभागातील अठरा गावातील नागरिक एकत्र येऊन मागणी करून आंदोलनाचा इशारा देऊन आंदोलन उभारण्यात गडचिरोली वनवृत्त कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले आहे. पोर्ला वनपरिक्षेत्रात वाघाची दहशत निर्माण होऊन निष्पाप नागरिकांचा  वाघाच्या हल्ल्यात बळी जात असल्याने नागरिकांचा आंदोलन , निवेदना ची दखल घेऊन  गडचिरोली वनवृत्ताचे वनसंरक्षक डॉ.  किशोर मानकर यांनी वाघाची दहशत, हल्ले  लक्षात घेता नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार  सुनील लिमये , प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नागपूर यांना प्रस्ताव पाठवून जेरबंद करण्याची मागणी करण्यात आली आहे.
 पोर्ला वनपरिक्षेत्रात वारंवारवाघांचे हल्ले होत असल्याने नेमक्या कोणत्या वाघाने हल्ला केला आहे हे लावलेल्या  ट्रॅप  कॅमेरा व त्याचा पाऊलखुणा द्वारे ओळख पटली असल्याने त्या संदर्भाचा अहवाल प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नागपूर यांना सादर करण्यात आला त्या अहवालाच्या अनुषंगाने  वाघाला  जेरबंद करण्याचे आदेश दिनांक  ३ सप्टेंबर २०२१ ला  प्राप्त झाले असून वनविभागाकडून वाघाला  जेरबंद करण्याच्या हालचालीना वेग आला  आहे
वडसा वन विभागात वाघाला जेरबंद करण्यासाठी केले जात आहेत विविध उपाययोजना
पोर्ला वनपरिक्षेत्रात चुरमुरा नियतक्षेत्रात वाघाला जेरबंद करण्यासाठी विविध उपाययोजना आखण्यात आल्या आहेत त्यामध्ये सुरुवातीला वाघाचा वावर असलेल्या ठिकाणी दोन पिंजरे लावन्यात आले आहे.
वनविभागाने  वाघाला जेरबंद करण्यासाठी वन कर्मचाऱ्यांची चार पथके निर्माण करण्यात आली असून त्यांच्यावर नियंत्रण करण्याची जबाबदारी वनपरिक्षेत्र अधिकारी यांना देण्यात आली आहे.
वाघाला जेरबंद करण्यासाठी पिंजऱ्यामध्ये दोन बकरे ठेवण्यात आली असून त्याला बकऱ्याला  भक्षण करताना जेरबंद करण्याचे योजना सफल झाली तर दोनच दिवसात यशस्वी  मोहीम होणार आहे तर दुसरीकडे दोन दिवसात वाघाला जेरबंद करण्यात उशीर झाल्यास पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या देखरेखीखाली नेमबाज यांच्याकडून बेशुद्ध करण्यात येणार आहे
गडचिरोली जिल्ह्यात 20 वाघाची नोंद  असल्याची प्राथमिक  अंदाज वर्तवण्यात आली आहे.  ज्या वाघांची दहशत पसरलेली आहे आणि त्याच वाघाच्या हल्ल्यात निष्पाप माणसाचा बळी घेत आहेत त्या नरभक्षक वाघाची ओळख पटली असून तो नर जातीचा असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सध्या वनवृत्ता समोर सुरु असलेले आंदोलन त्याशिवाय लोकप्रतिनिधीने या मुद्दयाला लक्ष वेधले असल्याने वनविभाग वाघाला जेरबंद करण्यासाठी कसोशीने प्रयत्न चालू आहेत .दोन दिवसात वाघाला जेरबंद करून दहशतीतून नागरिकांना मोकळा श्वास घेन्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे धर्मवीर सालविठ्ठल उपवनसंरक्षक वडसा विभाग
.
वडसा वनविभागात मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी करण्यात आले उपाययोजना.
वडसा वनविभागात एकूण 134 युवकांची पी आर टी म्हणून  नेमणूक करण्यात आली आहे   त्यांना प्रशिक्षित केले असून त्यांच्याच स्थानिक प्रत्यक गावात पाच युवक पी आर टी म्हणुन काम करतील , यांच्याकडे जनजागृती तसेच वाघाचे माहिती स्थानिकांना देऊन मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी मदत करणार आहेत.
वाघाचा वावर असलेल्या परिसरातील रस्त्याच्या कडेला असलेला  झाडोरा साफ करण्यात आलेला आहे.
वाघाची दहशत असलेल्या ठिकाणी सभोवतालच्या गावातील नागरिकांना वाघ असल्यास सचेत करण्यासाठी वन विभागाच्या पथकाने वाघ असलेल्या ठिकाणी  पिवळ्या रंगाचे झेंडे लावून नागरिकांना सतर्क राहण्याचे सूचना करण्यात येत आहे.
वाघाची दहशत असलेल्या ठिकाणी जनजागृती करून सूचना फलक लावण्यात आले आहेत
वाघाचे सहनियंत्रण करण्यासाठी पाच युवकांचे असे एकूण पाच पथक तयार करण्यात आलेले असून त्याच्या कडून वाघाच्या हालचालीवर लक्ष ठेऊन असतात .

Comments are closed.