जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने भारत बंदला सक्रीय पाठिंबा.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
जालना, दि. ८ डिसेंबर – देशव्यापी शेतकर्यांच्या आंदोलनास सर्व पक्षांनी पाठिंबा देऊन भारत बंदची हाक दिली आहे. यानिमित्ताने जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने भारत बंदला सक्रीय पाठिंबा देऊन जालना जिल्हा बंदच्यासाठी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरला आहे. जिल्ह्यातील जनतेने आपले सर्व व्यवहार बंद ठेऊन भारत बंदला आणि शेतकर्याच्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा असे आवाहन जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख आणि आ. कैलास गोरंट्याल यांनी केले होते.
शहरातील मामा चौक येथून बंदचे आवाहन करण्यासाठी जालना जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने मोटारसायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, जिल्हाकार्याध्यक्ष राजेंद्र राख, प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी भिमराव डोंगरे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
आज देशामध्ये कधी नव्हे असे शेतकरी विरोधात काळे कायदे मोदी सरकार आणि भाजप सरकारने केले आहेत त्याच्याविरोधात गेल्या बारा दिवसांपासून दिल्लीमध्ये ठिकठिकाणी शेतकरी आंदोलन करीत आहेत पण त्याला कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद या सरकारने दिला नाही आणि हे कायदे वापस घेण्याच्या दृष्टिकोनातून पावले उचलले नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांनी देशव्यापी बंदचे आवाहन केलंय या आव्हानाला महाराष्ट्र आणि देशांमध्ये काँग्रेसने पाठिंबा दिला आहे नामदार बाळासाहेब थोरात यांचे नेतृत्वात महाराष्ट्रातील काँग्रेस आणि जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रत्येक गावात आणि तालुक्यात पाठिंबा दिला आहे, जिल्ह्यामध्ये सर्वत्र बंद पाळून काँग्रेसने या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे आणि या पाठिंब्यासाठी त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शहरातून मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जालना जिल्हा काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी दिली.
Comments are closed.