Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अवधूत तटकरे नी शिवबंधन तोडले.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 14,ऑक्टोबर :-  राष्ट्रवादीचे रायगडचे खा. सुनिल तटकरे यांचे पुतणे आणि माजी आ. अनिल तटकरे यांचे चिरंजीव माजी आ. अवधूत तटकरे यांनी शिवबंधन तोडून आज मुंबईत भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात भाजपमध्ये प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर आपण कोणत्याही दबावाखाली भाजप मध्ये प्रवेश केलेला नाही हे त्यांनी स्पष्ट केले.

अवधूत तटकरे हे रोहा नगरपरिषदेचे १२ वर्षे नगराध्यक्ष होते. त्यांची राजकीय वाटचाल ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून झाली. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्रीवर्धन मतदार संघातील आमदार राहिले होते. मात्र अदिती तटकरे यांना आमदारकीची तिकीट मिळाल्यानंतर ते काही वर्षे राजकारणापासून अलिप्त होते. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत जाऊन शिवबंधन बांधले. मात्र आज अचानक शिवबंधन तोडून त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

अहेरीतील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक मतदार यादीचा कार्यक्रम घोषित.

Comments are closed.