Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बिबट्याच्या हल्लात गुराखी जखमी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चन्द्रपूर १७ ऑगस्ट : ब्रह्मपुरी तालुक्यातील दक्षिण ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या डोरली येथे गुराखी अरुण ठाकरे वय 45 यांच्यावर आज  17 ऑगस्टला 11 वाजताच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली आहे .

वांद्रा बेटातील कक्ष क्रमांक 1052 मध्ये अरुण ठाकरे व डोरली येथीलच काही गुराखी आपल्या गुरे व म्हशी चालत असताना अचानक  दबा धरून बसलेल्या बिबट्याने गुराखी अरुण ठाकरे वर झडप घालून  हल्ला चढवून गंभीर जखमी केले सदर गुराख्याने काठीने बिबट्याचा प्रतिकार केल्यामुळे जीवित हानी टळली असली तरी उपचारासाठी आरमोरी येथे भरती करण्यात आले आहे उपजिल्हा रुग्णालय आरमोरी येथे दाखल करण्यात आले आहे या घटनेत परिसरात शालेय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी व पालक वर्गात तसेच शेतकरी यांच्या मनात बिबट्याच्या हल्ल्यामुळे दहशत निर्माण झाली आहे तरी बिबट्याची संभाव्य धोके लक्षात घेता संबंधित विभागाने त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील जनतेने केली आहे.

 

हे देखील वाचा :

बुर्गी पोलीस कॅम्प वरील तथाकथित ड्रोन हल्ला हा सपशेल खोटा,बनावटी पोलीस प्रचार आहे, माओवादी पार्टी चा याच्याशी कसलाही संबंध नाही.

 

अहेरी,चामोर्शी, मुलचेरा, व भामरागड तालुक्यातील महिला बचत गटांना नवीन रेशन दुकाने अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट

 

अखेर… खाजगी शाळांच्या १५ टक्के फी कपात पालकांना मोठा दिलासा

जन्मदिवशी आईला हेलिकॉप्टरमधून मुलांनी घडविली सैर !

Comments are closed.