सैन्य दलातील जवानाचे कृत्य मद्य पाजून अतिप्रसंग करत असल्याची तक्रार
हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर पोलिसात गुन्हा दाखल
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
हिंगोली 10 फेब्रुवारी :- दिवसेंदिवस महिलावरील अत्याचार कमी होताना काही दिसून येत नाहीत त्यातच एक धक्कादायक बातमी समोर येते ती म्हणजे हिंगोली जिल्ह्यातील कसबे धवंडा गावातील एका मुलीला मद्य पाजून नेहमी अतिप्रसंग केला जात असे याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलीसात एका जवानाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कळमनुरी तालुक्यातील कसबे धावंडा येथील गौतम प्रभाकर खिल्लारे असे आरोपी जवानाचे नाव आहे. सदरील आरोपी हा सैन्यदलात कार्यरत असून गेल्या वर्षी या वीस वर्षीय युवतीशी ओळख झाली, अन या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. तो जवान एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने संबंधित युवतीसोबत नाटक म्हणून लग्न देखील केले होते, यामध्ये तो जवान या युवतीला वारंवार लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अतिप्रसंग करत होता.
दोघांचे प्रेमसंबंध एवढे वाढले की आरोपी जवान या युवतीला मद्य पाजून तिच्यावर वारंवार अतिप्रसंग करू लागला. लग्नाचे आश्वासन दिल्याने ती तरुणी त्याचा अत्याचार सहन करत होती. मात्र, तो जवान लग्नाचा विषय टाळून तिची फसवणूक करत असल्याचे तिच्या लक्षात आले. त्यानंतर तिने आखाडा बाळापूर पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
Comments are closed.