Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दिल्लीतील इस्त्रायली दूतावासाजवळ स्फोट

 दिल्लीतील औरंगजेब रोडवर स्फोट, ब्लास्टमुळे अनेक गाड्यांच्या काचा फुटल्या आहे.

स्फोट झाला ते ठिकाण विजय चौकपासून फक्त दीड किलोमीटर अंतरावर आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

दिल्ली डेस्क 29 जानेवारी :-  दिल्लीतील इस्त्रायली दूतावासाजवळ स्फोट झाला आहे. या ब्लास्टमुळे अनेक गाड्यांच्या काचा फुटल्या आहे. दिल्ली पोलिसांची स्पेशल टीम घटनास्थळी पोहोचली आहे. दिल्लीचे पोलिस कमिशनर एसएन श्रीवास्तव म्हणाले, राजेश पायसट मार्क येथे हा स्फोट झाला आहे. ज्या ठिकाणी स्फोट झाला त्या ठिकाणापासून इस्त्रायली दूतावास 150 मीटर अंतरावर आहे.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 एपीजे अब्दुल कलाम रोडवरील जिंदल हाऊसजवळ एक आईईडी ठेवला होता. यामध्ये कोणतीही हानी झाली नाही. तीन गाड्यांच्या काचा फुटल्या आहेत. संपूर्ण परिसर हा सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. स्फोटानंतर संपूर्ण परिसरात नाकेबंदी करण्यात आली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

भारत आणि इस्त्राईल आज त्यांच्या राजनैतिक संबंधांच्या 29 वर्ष पूर्ण झाल्याचा उत्सव साजरा करीत आहेत. याबाबत इस्त्रायली दूतावासानेही ट्विट केले आहे. जेथे हा स्फोट झाला ते ठिकाण विजय चौकपासून फक्त दीड किलोमीटर अंतरावर आहे. विजय चौक येथे यावेळी बीटिंग रिट्रीट चालू आहे, या कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित आहेत. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस उपस्थित आहे. हा स्फोट कसा झाला आणि कोणी केला याचा शोध सुरु आहे. पोलिसांनी त्या भागाला वेढा घातला आहे. फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी पोहोचली आहे.

(हे पण वाचा :- Loksparsh Exclusive: गडचिरोलीचा कसनसुरच्या रोहित मडावीचे कोविड मुक्त भारत हे चित्र ठरले देशपातळीवर अव्वल..)

Comments are closed.