Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अहेरी प्रकल्पातील शिक्षकांची प्रलंबित प्रकरणे निकाली काढा; अन्यथा चौकशी लावू

आमदार सुधाकर अडबाले यांचे प्रकल्प कार्यालयातील अधिकाऱ्यांना निर्देश

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

अहेरी : अहेरी प्रकल्पातील शिक्षक – कर्मचाऱ्यांचे वेतन अनियमित होत असणे, सेवानिवृत्त / मयत कर्मचाऱ्यांची पेन्शन व इतर आर्थिक लाभ प्रलंबित ठेवणे, थकीत वेतन देयके, वेतनवाढी न लावणे व इतर प्रकरणे प्रलंबित ठेवली जात असून सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी अहेरी प्रकल्प कार्यालय करीत नसल्याचे समस्या निवारण सभेत आमदार सुधाकर अडबाले यांच्या निदर्शनास आले. वरील प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढा; अन्यथा प्रकल्प कार्यालयाची चौकशी लावू, असे निर्देश आमदार सुधाकर अडबाले यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांना दिले.

विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचा उपक्रम “समस्‍या तुमच्या, पुढाकार आमचा” अंतर्गत सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले यांच्या अध्यक्षतेखाली एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अहेरी / भामरागड प्रकल्पाअंतर्गत आश्रमशाळेतील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्‍यांबाबत समस्‍या निवारण सभा २६ सप्टेंबर रोजी एकलव्य पब्लिक स्कूल सभागृह, अहेरी येथे पार पडली. ही सभा साडेतीन तास चालली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सभेत अहेरी / भामरागड प्रकल्पातील सर्व आश्रमशाळा मुख्याध्यापकांची बैठक घेऊन वेतन देयके २० तारखेच्या आत सादर करण्याबाबत सूचना द्या आणि वेतनाबाबत दिरंगाई करू नका, अशी तंबी आमदार सुधाकर अडबाले यांनी अधिकाऱ्यांना दिली.

सोबतच सेवानिवृत्त / मयत कर्मचाऱ्यांची पेन्शन केस व इतर आर्थिक लाभाची प्रकरणे, जीपीएफ व डीसीपीएसच्या पावत्या तात्काळ देणे, एकस्तर वेतनश्रेणी लागू करणे, सेवा पुस्तिका पडताळणी करणे, सेवानिवृत्ती प्रकरणे तात्काळ मंजूर करणे, कर्मचाऱ्यांचे वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रस्ताव निकाली काढणे, वैद्यकीय देयके, थकीत देयके, कार्यरत कर्मचाऱ्यांच्या अर्जित रजा वेतन, वैद्यकीय रजा, प्रसुती रजा व इतर रजा प्रलंबित कर्मचाऱ्यांची माहिती देणे, प्रकल्पातील मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ देणे, कर्मचाऱ्यांची मूळ सेवा पुस्तिका तयार करून त्यांना दुय्यम प्रत अद्यावत करून देणे तसेच इतर सामूहिक व वैयक्तिक समस्यावर चर्चा करून सदर समस्या तात्काळ निकाली काढण्याचे निर्देश प्रकल्प अधिकाऱ्यांना आमदार श्री. सुधाकर अडबाले यांनी दिले. सभेला अहेरी / भामरागड प्रकल्प कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यावेळी गजानन लोनबले, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हा कार्यवाह अजय लोंढे, संस्कृती संघटनेचे उपाध्यक्ष यादवराव धानोरकर, गणेश पहापळे, किशोर पाचभाई, रेवनाथ लांजेवार, मारोती गौरकर, खुशाल दिवसे, राधेश्याम गोबाडे, प्राचार्य निकुले, सूर्यवंशी सर, भोंगळे सर, बल्की सर, देशमुख सर व मोठ्या संख्येने आश्रमशाळा समस्याग्रस्त शिक्षक – कर्मचारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.