Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

महाडीबीटी पोर्टलवर प्रमाणित बियाणे वितरण, पीक प्रात्यक्षिके, सुधारीत कृषि औजारे व सिंचन सुविधा साधने या घटकासाठी शेतकऱ्यांचे अर्ज घेण्यास सुरुवात

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, 25 ऑगस्ट  :सन 2021-22 मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान- अन्नधान्य पिके व गळीत धान्य अंतर्गत रब्बी हंगामामध्ये प्रमाणित बियाणे वितरण, पीक प्रात्यक्षिके, सुधारीत कृषि औजारे व सिंचन सुविधा साधने या बाबींसाठी इच्छुक शेतकऱ्यांचे महाडीबीटी प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात आले आहेत. पीक प्रात्याक्षिके शेतकरी गटामार्फत राबविली जाणार असल्याने पीक प्रात्यक्षिकांसाठी अर्ज करताना संबंधित कृषि सहाय्यकांशी संपर्क करून 10 हे. क्षेत्र असणाऱ्या गटांनी नोंदणी करावी.

 

शेतकऱ्यांना नोंदणी करण्यासाठी दि. 30 ऑगस्ट, 2021 ते दि.10 सप्टेंबर,2021 पर्यंत मुदत देण्यात येत आहे. विहित मुदतीत नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांचाच विचार केला जाईल.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान- अन्नधान्य पिके व गळीतधान्य कार्यक्रम पुढिल नमूद जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येतो. गहू- सोलापूर, बीड, नागपुर. कडधान्य (हरभरा) -राज्यातील सर्वजिल्हे. भरडधान्य (मका) – नाशिक, धुळे, जळगाव,अहमदनगर, सांगली,औरंगाबाद, जालना. पौष्टिक तृणधान्य -नाशिक,धुळे, नंदुरबार,जळगाव, अहमदनगर, पुणे, सोलापूर,सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला , वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली. गळीतधान्य – सांगली, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली,वाशिम,चंद्रपूर.

बियाणे वितरण – वरीलप्रमाणे नमूद केलेल्या जिल्ह्यांमध्ये हरभरा बियाण्यासाठी 10 वर्षा आतील वाणास रु.25/- प्रती किलो,10 वर्षा वरील वाणास रु. 12/- प्रती किलो,संकरीत मका रु.95/- प्रती किलो व रब्बी ज्वारी बियाण्यासाठी 10 वर्षा आतील वाणास रु.30/- प्रती किलो, 10 वर्षा वरील वाणास रु. 15/- प्रती किलो,करडई बियाण्यासाठी रु. 40/- प्रती किलो,गहू बियाण्यासाठी 10 वर्षा आतील वाणास रु. 20/- प्रती किलो, 10 वर्षा वरील वाणास रु. 10/- प्रती किलो.एकूण किंमतीच्या 50 टक्के मर्यादेत अनुदान देय आहे.प्रमाणित बियाणे वितरणासाठी एका शेतकऱ्याला 2 हेक्टर मर्यादेत लाभ देय आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

पीक प्रात्यक्षिके – पीक प्रात्यक्षिकासाठी एका शेतकऱ्याला 1 एकर मर्यादेत निविष्ठा स्वरूपात अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे. बियाणे,जैविक खते, सुक्ष्ममूलद्रव्ये, भू सुधारके व पीक संरक्षण औषधे या निविष्ठांसाठी शेतकऱ्याला एक एकरच्या मर्यादेत एका पिकासाठी संबंधीत पिकाच्या प्रकारानुसार रु. 2000/- ते 4000/- प्रती एकर मर्यादेत DBT तत्त्वावर अनुदान अदा करण्यात येणार आहे.यासाठी कृषि विद्यापीठांचे शास्त्रज्ञांचे सल्ल्याने जिल्हानिहाय पॅकेज तयार करण्यात येत असून संपूर्ण पॅकेजचा वापर करणे अनिवार्य आहे. शेतकऱ्यांची निवड ऑनलाईन लॉटरी पद्धतीने होणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.