Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नवेगाव नजीक अवैध रेती वाहतूक करणारे चार मिनी ट्रक जप्त..सहा.जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी आशिष येरेकर यांच्या पथकाची कारवाई.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

गडचिरोली:13मार्च

लांझेंडा रेती घाटावरून अवैध रेती वाहतूक करणारे चार मिनी ट्रक सहायक जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या पथकाने कारवाई करून जप्त केले आहे.
ही कारवाई आज सकाळच्या सुमारास चंद्रपूर रोड नवेगाव येथे करण्यात आली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आज सकाळच्या सुमारास लांजेडा रेती घाटावरून नवेगाव च्या दिशेने चार मिनी ट्रक द्वारे अवैध रेती ची वाहतूक होत असल्याची माहिती सहा.जिल्ह्याधिकारी आशिष येरेकर यांच्या पथकाला लागली असतांना त्यांनी रेती वाहतूक करणारे ट्रक थांबवून वाहतूक परवाना तपासला असता त्यात संशयास्पद असे आढळून आल्याने   रेती सह  चार मिनी ट्रक पंचनामा करून जप्त करण्यात आले.

या मध्ये  4 मिनी ट्रक  व 9 ब्रास रेतीचा पंचनामा  करून उपविभागीय कार्यालय गडचिरोली येथे ठेवण्यात आले आहे.
 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

अवैध रेती वाहतूक करणारे मिनी ट्रक जप्त करून उपविभागीय कार्यालय गडचिरोली येथे ठेवण्यात आले आहे.

ट्रक क्र. Mh-33T 9161, Mh34 Ab 6847,Mh33 T 1890,Mh34 Av2441 ..
या कारवाई मध्ये सहायक जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या सोबत नायब तहसीलदार हेमंत मोहरे यांच्यासह तलाठी अजय तुनकलवार,भूषण जवंजाळकर,गणेश खंडारे, कोतवाल किशोर मडावी यांचा सहभाग होता.

Comments are closed.