Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली आज 9 नवीन कोरोना बाधित तर 1 कोरोनामुक्त

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली 18 फेब्रुवारी :- आज जिल्हयात 9 नवीन बाधित आढळून आला. तसेच आज 1 जणानी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 9436 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 9285 वर पोहचली. तसेच सद्या 46 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 105 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.40 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.49 टक्के तर मृत्यू दर 1.11 टक्के झाला.

नवीन 9 बाधितांमध्ये गडचिरोलीतील 7 जणाचा समावेश आहे. तर अहेरी तालुक्यातील 1 जणाचा व कुरखेडा तालुक्यातील 1 जणाचा समावेश आहे. आज कोरोनामुक्त झालेल्या 1 रूग्णांमध्ये गडचिरोली 1, जणाचा समावेश आहे.
नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील राणीदुर्गावती शाळा 1, डोंगरगाव 1, शेडमाके चौक 1, रामनगर 1, फुलेवार्ड 1, पोलीस कॉलनी 1, वाकडी 1, कुरखेडा तालुक्यातील बाधितांमध्ये तळेगाव 1, अहेरी तालुक्यांतील एटापल्ली 1, तर इतर जिल्हयातील 0, बाधिताचा समावेश आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.