अर्णबनंतर फिरोज शेख, नितेश सारडा यांना पोलिसांनी केली अटक .
14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:-
रिपब्लिक टीव्हीचे मालक आणि संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक केल्यानंतर आता आणखी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. फिरोज शेख, नितेश सारडा अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दरम्यान, अन्वय नाईक यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहीली होती. त्या चिठ्ठीत रिपब्लिकचे अर्णब गोस्वामी, स्काय मीडियाचे फिरोज शेख आणि स्मार्ट वर्क्स कंपनीचे नितेश सरजा यांच्यामुळे आत्महत्या करत असल्याचं नमूद केले होते.

या कारवाईने राज्यसह केंद्रापर्यंत संपूर्ण राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यानंतर अलिबागच्या सत्र न्यायालयानं अर्णब यांना १८ नोव्हेंबरपर्यंत म्हणजेच १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. खरंतर, अर्णबची पोलीस कोठडी मिळावी म्हणून सरकारी वकिलांकडून तब्बल १५ युक्तीवाद केले होते. मात्र, न्यायालयाने काही निरीक्षणे नोंदवत अर्णबच्या पोलीस कोठडीस नकार दिला. दुसरीकडे, अर्णब यांनी आपल्या जामिनासाठी अर्ज दाखल केला असून थोड्याच वेळात न्यायालयात त्यावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे या निकालाकडे आणि या संपूर्ण प्रकरणाकडे राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष आहे.
Comments are closed.