Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आलापल्ली ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस,भाजपा युतीची सत्ता. सरपंचपदी शंकर मेश्राम तर उपसरपंचपदी विनोद अकंनपल्लीवार यांची निवड

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

आलापल्ली :15 फेब्रुवारी

आज अहेरी तालुक्यातील सरपंच/उपसरपंच पदाचा निवडीचा कार्यक्रम होता.तालुक्यातील महत्वाची आणि मोठी ग्रामपंचायत असलेल्या आलापल्ली ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी राष्ट्रवादी काँग्रेसचे शंकर मेश्राम व उपसरपंच पदी भाजपचे विनोद अकंनपल्लीवार विराजमान झाले आहेत.
आलापल्ली येथील सरपंच पदाच्या निवडणुकीत आविस तर्फे विजय कुसनाके,उपसरपंच तर्फे शारदा कडते तर रा.कॉ +भाजप तर्फे सरपंच पदासाठी शंकर मेश्राम,उपसरपंच पदासाठी विनोद आकंनपल्लीवार यांनी नामांकन दाखल केले होते.दोन्ही विजेत्या उमेदवारांना 9 तर विरोधात 8 मते पडली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा


टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या निवडणुकीत अध्यासी अधिकारी म्हणून बाणाईत यांनी काम बघितले.
दोन्ही पदाच्या निवडणूकी नंतर नवनिर्वाचित सरपंच /उपसरपंचाचा आ.धर्मरावबाबा आत्राम यांनी हार घालून व पेढा भरवून अभिनंदन केले यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम ,ऋतुराज हलगेकर राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

कार्यकर्त्यांनी आलापल्ली येथील मुख्य चौकात फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष केला. यानंतर नवनियुक्त सरपंच उपसरपंचांची आलापल्लीत मिरवणूक काढून जनतेला अभिवादन केले.
नवनियुक्त सरपंच उपसरपंचाकडून आलापल्ली तील नागरिकांना विकासाची अपेक्षा आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.