Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

प्रलंबित वन हक्क दावे निकाली काढा जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांची अहेरीचे उपविभागीय दंडाधिकाऱ्या सोबत चर्चा

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी २६ ऑगस्ट: गडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी अहेरीचे नवनियुक्त उपविभागीय  दंडाधिकारी अंकित कुमार यांची आज उपविभागीय कार्यालयात भेट घेवुन अहेरी उपविभागातील प्रलंबित वन हक्क दाव्यानिकाली काढण्या बाबत चर्चा करण्यात आले.

तसेच अहेरी परिसरात गेल्या अनेक वर्षापासून नागरिक अतिक्रमण करून कस्त करत असुन वन हक्क पट्टे निम्म्या  नागरिकांना मिळाले आहेत.मात्र सात बारा नसल्याने धान्य विक्री करण्यास अडचण येत असल्याच सांगितले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

तसेच अहेरी,सिरोंचा,मूलचेरा तालुक्यातील आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी म्हणून  अंकित कुमार  यांच्याकडे पदभार असल्याने सदर तालुक्यातील प्रकल्प कार्यालयाअंतर्गत राबविन्यात येणाऱ्या योजने बाबत सविस्तर चर्चा करून जास्तीत जास्त नागरिकांना योजनेचे लाभ दिले पाहिजे असे सांगण्यात आले.

यावेळी अहेरीचे तहसीलदार  ओंकार ओतारी  ,अहेरी पंचायत समितीचे सभापती तथा उपविभागीय वनहक्क समितीचे सदस्य  भास्कर तलांडे,उपसभापती गीताताई चालुरकर,प.स.सदस्या शितल दुर्गे,छाया पोरतेट, योगीता मौहूर्ले,किस्टापूर ग्राम पंचायतचे माजी उपसरपंच  अशोक येलमूले,श्रीकांत बंडामवार,आदिची उपस्थिती  होती.

 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

गोंदिया जिल्ह्यातील ग्राम सेवकांचा विविध मागण्याना घेऊन कामबंद आंदोलन.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.