Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ठाकरे गटाने ठोठावले सुप्रीम कोर्टाचे दार .

निवडणूक आयोगाच्या निर्णया विरोधात ठाकरे गट सुप्रीम कोर्टात .

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 10 ऑक्टोबर :- निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यानंतर तसेच आगामी अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना हे नाव सुद्धा वापरता येणार नाही, हा निर्णय दिल्यानंतर शिवसेनेला फार मोठा धक्का बसला आहे.

सोमवारी दुपार पर्यंत ठाकरे गट व शिंदे गट या दोन्ही ही गटांना आपली पर्यायी चिन्हे आणि पक्षाचे नवीन नाव देण्यास सांगितल्यानंतर शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी तीन नावे प्रसार माध्यमांसमोर जाहीर केली. उगवता सूर्य, त्रिशूल, आणि धगधगती मशाल ही तीन चिन्हे सुचविली. तसेच पक्षाचे नाव देखील तीन प्रकारे दिले. असे असतांना आज सकाळी अचानक शिवसेना निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार असल्याची बातमी समोर आली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

शिवसेनेने निवडणूक आयोगाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात जाताना निवडणूक आयोगाने आम्हाला बाजू मांडण्यासाठी वेळ दिला नसल्याची मुख्य तक्रार आहे. तसेच अंधेरी पोटनिवडणुकी पर्यंत परिस्थिती पूर्वी प्रमाणेच ठेवावी असे शिवसेना ठाकरे गटाचे म्हणणे आहे. सुप्रीम कोर्ट शिवसेनेची ही याचिका दाखल करून घेते का हे पाहणे महत्वाचे ठरेल. तसेच दाखल केल्यानंतर कोर्ट निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देते का हे सुद्धा पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

निवडणूक आयोगाने देशाची लोकशाही गोठवली – कपिल सिब्बल.

समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव यांचे दीर्घ आजाराने निधन

Comments are closed.