Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नेत्यांना कंटाळून रिपब्लिकन आघाडीची स्थापना..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नागपूर, दि. १६ नोव्हेंबर : रिपब्लिकन पक्षाच्या विविध गटांच्या नेत्यांना वंâटाळून कार्यकत्र्यांनी एकत्र येत नागपूर येथे रिपब्लिकन आघाची स्थापना केली आहे.
इंदोरा येथे झालेल्या जुन्या व जाणत्या कार्यकत्र्यांच्या शनिवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
रिपब्लिकन कार्यकत्र्यांची दुसरी बैठक इंदोरा कामठी रोडवरील १० नंबर पूल नामांतर शाहिद स्मारकात झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ रिपब्लिकन कार्यकर्ते विनायकराव जामगडे होते. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी जनतेच्या हिता व रक्षणाकरीता रिपब्लिकन चळवळ दिली. मात्र, काही स्वार्थी व संधी-साधू नेत्यांनी जनतेच्या चळवळीची खाजगीकरण करून रिपब्लिकन ची शकले केली. त्यामुळे रिपब्लिकन चळवळीची दुर्दशा झालेली आहे. रिपाइं नेते एकत्र येत नाही. ते एकत्र राहू शकत नाही. त्यामुळे नागपुर शहरातील रिपब्लिकन कार्यकर्तायानी एकत्र येवून रिपब्लिकन चळवळीला नव्याने उभे करण्याचे कार्य आपल्या हाती घेतले आहे, असे जामगडे यांनी सांगितले. या बैठकीत रिपब्लिकन आघाडीच्या नावाने विभाग व वार्ड बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच जनतेच्या प्रश्नांवर जनआंदोलन उभे करण्याचा ठराव पारित करण्यात आल्याचे दिनेश अंडरसहारे यांनी सांगितले.

तसेच जनतेच्या प्रश्नांवर जनआंदोलन उभे करण्याचा ठराव पारित करण्यात आल्याचे दिनेश अंडरसहारे यांनी सांगितले.
या बैठकीत रिपब्लिकनच्या अनेक गटातील कार्यकत्र्यांंनी नागपूर शहरात एकत्र येवून काम करण्यासाठी रिपब्लिकन आघाडीची स्थापना केली. त्यामध्ये सल्लागार समितीमध्ये हरिदास टेंभुर्णे, विनायक जामगडे, घनश्याम फुसे, निरंजन वासनिक शेषराव रोकडे व रावसाहेब ढोके यांचा समावेश करण्यात आला. तसेच संयोजन समितीमध्ये संजय पाटील, दिनेश अंडरसहारे, विशाल गोंडाणे, सचिन गजभिये, विश्वास पाटील, प्रा. राजेंद्र टेंभुर्णे, धर्मपाल वंजारी, सुनील जवादे, सिद्धार्थ पाटील व डॉ. मनोज मेश्राम याचा समावेश करण्यात आला. कायदेशीर सल्लागार म्हणून अ‍ॅड. मानवेन्द्रबाबू हरिदास आवळे यांची सर्व सहमतीने नियुक्ती करण्यात आली.
या बैठकीत शिरीष धंद्रवे, अमर भांगे, प्रफुल्ल तिरपुडे, सुखदेव मेश्राम, सिद्धार्थ नंदेश्वर, उमर खान, अमर सूर्यवंशी, अमित वालदे, दीपक खोब्रागडे, दीपक वालदे, महमोल ओगले, राकेश मेश्राम आदी उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.