Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

18 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार ‘वंडर विमेन’ चित्रपट

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

 

मुंबई, 04 नोव्हेंबर :- आपली नाती विश्वसनीय, वैवाहिक, रोमॅंटिक व आदरणीय अशा विविध प्रकारची असू शकतात. पण या सर्वांमध्ये एक नाते गोड, प्रेमळ व उत्साही असते. ते म्हणजे महिलांचे. महिला एकमेकांना परिचति अनुभव, भिती व आशा यामध्ये नेब्हिगेट करण्यास मदत करण्यासाठी एकत्र येतात. तेव्हा त्यांचा असा समाज निर्माण होतो. जो संकटात त्यांच्या पाठीशी उभा राहतो. त्यांना अधिक प्रबळ करतो. हा प्रवास व त्यांच्या धैर्याला प्रशंसित करत सोनी लिव्ह जीवनाचा सार दाखवणारा चित्रपट ‘वंडर विमेन’ सादर करत आहे. अंजली मेनन यांचे लेखन व दिग्दर्शन असलेला हा चित्रपट 18 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.

हा चित्रपट सहा गर्भवती महिलांची कथा सादर करतो. ज्या गर्भधारणा व बाळंतपणाबात विश्वास, गोधळ आणि प्रसूतीपर्वू कक्षामध्ये येतात. या सर्व गोष्टींचा उलगडा करण्याच्या प्रयत्नात त्यांना त्यांची ओळख आणि त्यांच्या खोलवर रूजलेल्या समस्यांची उत्तरे सापडतात. हा चित्रपट व संकल्पनेबाबत सांगतांना अंजली मेनेन म्हणाल्या, मला अनुभवातून समजले आहे कह भगिनी आपल्याला वैयक्तिक आणि सामुहिकरित्या सक्षम करू शकतात. वंडर विमेन सह माझे हे प्रेमळ बंध विविध पार्श्वभूमीतील अेक पात्रांद्वारे आणि जीवनाला सामोरे जाण्याच्या त्यांच्या मजेशीर व आनंददायी पध्दतीने सादर करध्याची इच्छा होती. ही पात्रे सामान्य महिला आहेत, जी देशभरातील सर्व वयोगटातील प्रेक्षांचे लक्ष वेधून घेतील. ही कथा त्यांच्या जीवनाला आणि गर्भधारणा व त्यांची नवीन मैत्री त्यांना पुढे जाण्यास देणार्या स्फूर्तीला सादर करते. सोनी लिव्ह नविन कन्टेन्ट व अभूतपूर्व संकल्पना सादर करत आहे, ज्यामुळे सोनी लिव्ह वर हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.