Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

इस्तांबूलच्या भीषण स्फोटात 6 जणांचा मृत्यू

81 जखमी, एकाला अटक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

तुर्की, 14 नोव्हेंबर :- तुर्कीची राजधनी इस्तांबूल मध्ये झालेल्या भीषण स्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला असून 81 लोक जखमी झाले आहेत. अशातच या आत्मघाती हल्ल्यात सहभागी असलेल्या एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. राज्याद्वारे संचालित अनादोलू एजन्सीच्या इंग्रजी भाषेतील ट्विटर अकाउंटवरून देण्यात आलेल्या माहितीनुसार, गृहमंत्री सुलेमान सोयलू यांनी सोमवारी सांगितले की, इस्तंबूलमध्ये स्फोट घडविणार्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. रविवारी संध्याकाळी इस्तंबूलच्या मध्यभागी एका वर्दळीच्या ठिकाणी हा स्फोअ झाला. यात 6 जणांचा मृत्यू झाला असून 81 लोक जखमी झाले आहेत.

हल्ल्यानंतर अल जझिराने सुत्रांचा हवाला देत दावा केला आहे की, या हल्ल्यात तीन लोक सामील होते. त्यापैकी एक महिला आणि दोन तरूणांचा समावेश आहे. हल्ल्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पडताळण्यात आले. यामध्ये एका संशयित महिला स्फोटाच्या ठिकाणी रस्त्यावर बॅग टाकून बाहेर येतांना दिसली. त्यानंतर काही मिनिटांतच मोठा स्फोट झाला. त्यानंतर महिलेने ठेवलेल्या बॅगेतच बाॅम्ब असल्याचे स्पष्ट झाले. वर्दळ असलेल्या ठिकाणी स्फोटाच्या घटनेनंतर या सर्व परिसरात पोलिसांनी नाकेबंदी केली. तसेच या परिसरातल्या सर्व सीसीटीव्ही कॅमेर्यांची पडताळणी करण्यात आली. या स्फोटामागे नेमका हात कोणाचा? याची पडताळणी सुरू आहे. या स्फोटानंतर सर्व शहरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणात एकाला अटक करण्यात आली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

तुर्कीचे अध्यक्ष एर्दोगान यांनी या स्फोटामागे दहशतवादी संघटनांचा हात असल्याची शक्यताा वर्तवली आहे. या स्फोटामागे जे कुणी असतील त्यांना शोधले जाईल आणि शिक्षा दिली जाईल असे ते म्हणाले. या स्फोटानंतर तपास यंत्रणांना आदेश देण्यात आले असून लवकरच हल्लेखोरांना पकडू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.