Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अजरबैजानवर रशिया आणि आर्मेनियाचा हल्ला; रणभूमीत शेकडोंचा मृत्यू.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मागील 33 दिवसांपासून आर्मेनिया आणि अजरबैजानमध्ये युद्ध सुरु आहे. या युद्धात यावेळी पहिल्यांदाच आर्मेनियाचं विध्वंसक रूप सगळ्या जगाला दिसलं. 32 दिवसांपासून इस्लामिक देशांकडून आर्मेनियावर हल्ला सुरु होता. पण यावेळी आर्मेनीयाने रशियाच्या मदतीने अजरबैजानवर जोरदार हल्ला केला आहे. या हल्ल्यामुळे अजरबैजानची मोठी जीवितहानी झाल्याचं सांगितलं जात आहे.

मागील काही दिवसांपासून रशिया आर्मेनिया आणि अजरबैजान या दोन देशांमध्ये शांती प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करत होता. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना नागोर्नो-काराबाखवरुन सुरु असलेला हा संघर्ष थांबावा असं वाटत होतं. पण, तुर्कीच्या कटकारस्थानामुळे अजरबैजान वारंवार युद्धविरामाचं उल्लंघन करत राहिला. रशियानं अनेकदा अजरबैजानला इशाराही दिला. तसेच तुर्कीला या युद्धात हस्तक्षेप न करण्याची समजही दिली. पण, नागोर्नो-काराबाखवरुन संघर्ष काही थांबला नाही. शेवटी स्वत: रशियाच आपल्या सर्व प्रगत हत्यारांसह युद्धाच्या मैदानात उतरला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अर्मेनिया देशाला रशियाकूडन सैन्याची तसेच आधुनिक शस्त्रांची मदत मिळत आहे. त्यामुळे अर्मेनियाची ताकद वाढली आहे. रशियाकडून मदत मिळताच आर्मेनियानं अजरबैजानच्या बर्दा शहरावर स्मर्च मल्टी बॅरल रॉकेट लॉन्चरनं जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात अजरबैजानची अनेक सैनिक मारले गेले आहेत. तसेच रशियाच्या BM-30 स्मर्चनं बर्दाच्या रहिवाशी भागात चांगलाच विध्वंस केल्याची माहिती आहे. रशियानं बर्दा भूमिवर केलेल्या या हल्ल्यांमुळे अजरबैजानच नाही, तर तुर्की देशही घाबरला आहे. कारण युद्धाच्या 32 दिवसांच्या कालावधित रशियाने बीएम-30 स्मर्चने केलेला हल्ला सर्वात विध्वंसक मानला जात आहे.

या युद्धात 20 दिवसांमध्ये जवळपास 52 हजारांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. सध्या 33 दिवस उलटूनही हे युद्ध थांबण्याचे कोणतेही स्पष्ट चिन्हं नाहीत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.