Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

इंग्लंडमध्येही पुन्हा लॉकडाऊन,या आधी फ्रान्स-जर्मनी मध्ये झाला होता लॉकडाऊन. कोरोनाबाधितांची संख्या 10 लाखांच्या पुढे.

रोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्यामुळे युरोपातील देशांमध्ये पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्यामुळे युरोपातील देशांमध्ये पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. जर्मनीमध्ये कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत 40 वाढ झाल्यामुळे 2 नोव्हेंबरपासून लाॉकडाऊनची कडकपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. फ्रान्समध्ये शुक्रवारपासून लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. स्पेनमध्येही यापूर्वीच लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. या देशांपाठोपाठ आता इंग्लंडमध्येदेखील पुन्हा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी शनिवारी कडक लॉकडाऊनची घोषणा करत सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यूकेमध्ये कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या 1 मिलियन (10 लाख) होताच पीएम जॉनसन यांनी अचानक लॉकडाऊनची घोषणा केली. यावेळी त्यांनी सांगितले की, आता व्यापार आणि देनंदिन जीवनावर कडक नियम लावण्यात आले आहेत. हा लॉकडाऊन गुरुवारी सुरु होईल आणि 2 डिसेंबरपर्यंत लागू असेल.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

एका न्यूज कॉन्फरन्समध्ये बोलताना पंतप्रधान जॉनसन म्हणाले की, कोणताही जबाबदार पंतप्रधान कोरोनाच्या गंभीर आकडेवारीकडे दुर्लक्ष करु शकत नाही. देशात कोरोनाबाबतच्या नियमांचे काटेकोरपणे पालन नाही झालं तर देशात दररोज हजारो लोक प्रमाण गमावतील. यापूर्वीच लाखो लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. हजारो लोक रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहे. त्यापैकी काहींची अवस्था गंभीर आहे. आपला देश अजून मृत्यू पाहू शकत नाही.

फ्रान्सचे अध्यक्ष इम्यानुअल मॅक्रॉन यांनीही देशात 1 डिसेंबरपर्यंत लॉकडाऊन जाहीर केले आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्यामुळे शुक्रवार (30) ऑक्टोबरपासून फ्रान्समध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. यादरम्यान फ्रान्समध्ये फक्त अत्यावश्यक सेवा आणि वैद्यकीय अडचण असल्यास बाहेर पडता येणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये काळजी घेतली गेली नाहीतर कोरोनामुळे मृत्यूंची संख्या 4 लाखांवर जाऊ शकते, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.

Comments are closed.