Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

इथे प्रेयसी बाळंत झाली, तिथे प्रियकर तिच्या आईसोबत पळाला!!

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

वृत्तसंस्था, दि. १९ फेब्रुवारी:- प्रेमात फसवणूक झाली की, दुःख होतं. अशी फसवणूक करणारी व्यक्ती जवळची असेल, तर या  त्रासाला काहीच सीमा नसते. असाच काहीसा प्रकार एका तरुणीसोबत झाला आहे.

ही घटना इंग्लंड येथे घडली आहे. येथे राहणाऱ्या जेस अल्ड्रिज या (24) वर्षांच्या तरुणीचे रायन शेल्टन (29) या तरुणाशी प्रेमसंबंध होत. या नात्यातून त्यांना एक मुल ही आहे. याच नात्यात जेस दुसऱ्यांदा गर्भवती राहिली आणि तिने 28 जानेवारी रोजी बाळाला जन्म दिला. पण या नात्याला जोडून अजून एक नात आकार घेत होतं. याची कल्पना जेस ला अजिबात नव्हती.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जेस ची आई जार्जिना (48) ही देखील रायनच्या प्रेमात पडली होती. रायन जेव्हा केव्हा जेसला भेटायला घरी येत असे, तेव्हा जार्जिना त्याच्याशी फ्लर्ट करीत असे.

आधी ही गोष्ट जेसने मनावर घेतली नाही. पण ज्या दिवशी तिच्या दुसऱ्या बाळाचा जन्म झाला. त्याच दिवशी रायनने तिला मेसेज पाठवून हे नातं तोडत असल्याचं सांगितलं. जेस चक्रावली. तिला यामागचा अर्थ कळेना. पण, थोड्याच वेळात तिला या प्रकाराचा उलगडा झाला. तिचा प्रियकर तिच्या आईसोबत फरार झाला आणि त्यांनी दुसरीकडे घर घेऊन घरोबा थाटला असल्याची माहिती मिळाली. या प्रकाराने जेसला दुःख झाले. दुसरीकडे तिची आई आणि प्रियकर यांनी सोशल मीडियावर आपल्या नात्यातील कबुली दिली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.