जो बायडेन यांनी चुकीच्या पद्धतीने राष्ट्राध्यक्ष कार्यालयावर दावा करु नये – डोनाल्ड ट्रम्प
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
वॉशिंग्टन, वृत्तसंस्था दि. ०७ नोव्हेंबर: अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा अंतिम निकाल अद्यापही लागला नाही. मतांची मोजणी अद्याप सुरु आहे.
डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. मात्र, रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत ‘जो बायडेन यांनी चुकीच्या पद्धतीने राष्ट्राध्यक्ष कार्यालयावर दावा करु नये’ असा इशारा दिला आहे. मीदेखील तसा दावा करु शकतो, असेही ट्रम्प म्हणाले.
निवडणुकीच्या रात्री मला या सर्व राज्यांमध्ये आघाडी होती. पण ही आघाडी अचानक गायब होताना दिसत आहे. कदाचित आमची कायदेशीर प्रक्रिया पुढे जाईल त्याप्रमाणे आघाडी परतेल, असेही ट्रम्प यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.
पेन्सिलव्हेनिया, नेवादा, आणि जॉर्जियामध्ये बायडन आघाडीवर आहेत. तर, ट्रम्प यांनी पुन्हा एकदा मतमोजणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पेन्सिलव्हेनिया, नेवादा, मिशिगन आणि जॉर्जियामधील मत मोजणीबाबत ट्रम्प यांनी न्यायालयात याचिक दाखल केली असून त्यांनी पुन्हा मतमोजणी करण्याची मागणी केली आहे.
Comments are closed.