Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

लहान मुलांसाठीची कोरोना लस ऑक्टोबरपर्यंत- सीरम

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई 31 जानेवारी :– कोरोनाच्या प्रादुर्भावातून लहान मुलांना वाचवण्यासाठी आता लवकरच कोरोनाची लस तयार होणार आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं हा दावा केला आहे. EXIM ग्रुपचे संचालक पीसी नांबियार यांनी दिलेल्या माहितीनुसार आता लवकर लहान मुलांसाठी कोरोना लस तयार केली जाणार आहे. ऑक्टोबरपर्यंत ही लस तयार होईल असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे. महत्वाची बाब म्हणजे ही लस 1 महिन्याच्या बाळालाही दिली जाऊ शकणार आहे.

कोचीमध्ये एका कार्यक्रमात बोलताना नांबियार यांनी सांगितलं की ही लस आल्यानंतर मुलांना मोठा फायदा होणार आहे. ही लस पुढे चालून लहान मुलांसाठी कोरोनावरील औषध म्हणूनही काम करेल, असंही नांबियार म्हणाले. म्हणजे जर तुमच्या लहान मुलाला कोरोनाची बाधा झाली असेल तर ही लस तुम्हाला कोरोनापासून वाचवेल.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पीसी नांबियार यांनी दिलेल्या माहितीनुसार या लसीची क्लिनिकल ट्रायल सुरु आहे. नियोजनानुसार सर्वकाही ठीक पार पडलं तर ऑक्टोबरपर्यंत लस तयार होईल आणि वर्षाच्या अखेरपर्यंत ती मुलांना देण्यास सुरुवात होईल. नांबियार यांच्या म्हणण्यानुसार कोव्हिशील्ड ही लस मलेरियावर आधारित लस आहे. त्यामुळे ही लस कोरोनाच्या लक्षणांसाठीही फायदेशीर ठरेल. सरकारला गरज भासली तर एप्रिलपर्यंत लसीचे 20 कोटी डोस बनवू, असंही नांबियार म्हणाले.

Comments are closed.