शेतकरी का आंदोलन करत आहेत..?

प्रा. डाॅ. ललितकुमार शनवारे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

पेन्शनचेसुद्धा असेच केले कोणत्याही संघटना यांना न विचारता NPS लागू केले आणि पेन्शन सुद्धा कॉर्पोरेट लोकांच्या हातात दिली शेतकरी का आंदोलन करत आहेत.?
मेंदू असलेल्या लोकांनी जाणून घ्या …!

काय आहे  प्रमुख मागण्या .

१) पहिली मागणी ..

  • मोदी सरकार म्हणत आहे शेतकर्यांच्या भल्या करता हा कायदा आणला आहे.
  • यासाठी १३ नोव्हेंबर ला जी मिटींग झाली त्यात मोदी सरकारचे तीन मंत्री होते.
  • त्यांना शेतकर्यांनी असे विचारले ,
  • तुम्हाला आमच्या कुठल्या संघटनेने या कायद्याची मागणी केली ? कुठल्या व्यक्तीने केली? कुठल्या सामाजीक संस्थेने केली?
  • यातील एकाही प्रश्नाचे उत्तर नव्हते.थोडक्यात संपूर्ण कायद्याचा ड्राफ्टच कोणी तरी बनऊन भारतीय शेतकर्यांचा माथी मारतोय.

२) दुसरी मागणी

  • मोदी सरकार म्हणत आहे, आम्हाला दलाल संपवायचे आहेत.
  • शेतकरी त्यावर म्हणत आहेत.
  • “दलाल ” या शब्दाची व्याख्या काय?
  • पंजाब हरयाणा येथील शेती व्यापाराचे मॉडेल जगात दि बेस्ट आहे.
  • शेतकरी म्हणातात..आम्ही रॉ माल आणतो.
  • संबधीत अडता तो माल ऊतरवतो, साफ करतो ,वर्गवारी करतो,पैकींग करतो व विकतो.
  • आम्हाला हे काही करावे लागत नाही…तो दलाल नाही तो सर्वीस प्रोव्हायडर आहे.
  • तुम्ही सरकारने स़रक्षण साहीत्य विकत घेताना दलाल बसवले आहेत.तो तिकडची वस्तू जशीच्या तवी ईकडे विकतो व मधले कमीशन खातो.
  • शेतीतले अडते हे नुसतं कमीशन खात नाहीत.
  • आम्हाला गाडीचे १५०० रूपये दिले तर ते १९५० रूपयाला तो माल विकतात व मधले ४५० ते सर्व सर्वीस व त्यांचा मोबदला लावतात .व हे सर्व शेतकरी करत बसला तर तो शेती कधी करणार.
  • अगोदर ” दलाल ” शब्दाची व्याख्या सांगा.

३) तीसरी मगणी..

  • मोदी सरकार म्हणते आम्ही शेतकर्यांच्या भल्या करता एक देश एक बाजार असा विधायक विचार करत आहोत.जेणेकरून देशाच्या कुठल्याही कोपर्यातील शेतकरी कुठेही त्याचा माल विकू शकेल.
  • यावर शेतकरी म्हणत आहेत , कशाला खोटे बोलत आहात.
  • आम्ही पंजाबचे शेतकरी १९७६ पूर्वी पंजाब झोन च्या बाहेर आमचा गहू व बाकी माल विकू शकत नव्हतो तेव्हा रस्त्यावर उतरलो होतो १४५० शेतकरी ४० दिवस तुरूंगात होते ,कोर्टात केस दाखल केली गेली व निकाल आमच्या बाजूने लागला व न्यायालयाने तेव्हाच स्पष्ट केले की देशातील कोणताही शेतकरी,त्याचा कितीही माल तो कुठेही विकू शकतो व त्या शेतकर्याला तुम्हाला स्टॉकीस्ट म्हणता येणार नाही कारण तो रक्त व घाम गाळून ते पिकवतो.
  • १९७७ ला जनात दलाचे सरकार आले तेव्हा पार्लमेंट मधे पहीला ऐतीहासीक ठराव संमत झाला तो म्हणजे पूर्ण देश हा एकच झोन बनवला गेला.
  • आणी तेव्हापासून महाराष्ट्रातील संत्री देशभर जातात…कश्मीर ची सफरचंदे देशभर जातात…पंजाबचा गहू देशभर जातो… सर्वत्र व्यवस्थीत व्यवहार आहे..
  • मग तुम्ही नविन काय काम केलेत ?
  • शेतकरी म्हणत आहेत…जी व्यवस्था अगोदरच गेली सत्तर वर्ष ट्राईड ऍंड टेस्टेड आहे ती तुम्ही ऊध्वस्त करत आहात.
  • मोदी सरकारने एक देश दोन बाजार हा कन्सेप्ट लोकांच्या माथी काही कार्पोरेट ला हाताशी धरून मारायचा निरृणय घेतलाय.
  • कारण या दोन बाजारात एक बाजार ..जो सध्या चालू आहे तो व दुसरा बाजार …ज्याच्याकडे पैसा आहे ती व्यक्ती फक्त पैन कार्ड व आधार कार्ड वर शेती या विषयात काहीही माहीती नसताना कुठुनही काही खरेदी करणार व कुठेही विकणार …यात जर त्यांनी शेतकरयृयाचे पैसे बुडवले ..तो फरार झाला….माल बुडवला…तर कायद्यात कोणतीही तरदूत नाही की शेतकरी दाद मागेल.
  • आता यात गंमत बघा ..समजा रीलांयस यात उतरले किंवा अदानी…तर या नविन कायद्या नुसार तो ..समजा देशात १०० किलो गहू पिकतोय तर तो सर्वच्या सर्व विकत घेऊ शकतो ..स्टॉक करू शकतो हवं तेव्हा विकू शकतो …प्रतीस्पर्धयाला संपवायला ..अवास्तव दर देऊन संपूरृण साखळी ऊध्वस्त करू शकतो..
  • दाद मागायला सरकार कडे गेलो तर ज्याचे सरकार आहे तो विरोधी पक्षाच्या लोकांना जुमानणार नाही…
  • थोडक्यात ..स़पूर्ण व्यवस्था दोन चार कार्पोरेट व्यवस्थापनाना खुष करण्यासाठी …मोदी सरकार हा कुठलाही मागणी नसलेला कायदा आढत आहे..व स्वामीनाथन आयोगाच्या मागण्यांना धुडकावत आहे.
  • हे सर्व कळल्यावर या आंदोलनाला पाठींबा द्यावासा वाटतोय.
  • कारण नेमकं काहीच कळत नव्हते शेतकरी रस्त्यावर का उतरलाय..
  • तो दिल्लीत येऊ नये म्हणून सरकारने हायवे ला मोठे खंदक खणून ठेवले आहेत.
  • एवढा कोणाचा दबाव आहे या सरकारवर.
  • आज जर शेतकरयांना पाठींबा दिला नाही तर ..हे आख्खा देश कार्पोरेटच्या हातात देतील.
delhi chalo protestdelhi farmers protestdelhi protestfarmer protestfarmer protest in haryanafarmer protest latest newsfarmer protest live updatesfarmer protest todayfarmers protestfarmers protest in delhifarmers protest in punjabfarmers protest livefarmers protest to delhifarmers protest todayfarmers protest today livefarmers protest videoharyana farmers protestpunjab farmer protestpunjab farmer protest live newspunjab farmers protest