जगा आणि जगू द्या.. वन्यजीव दिनानिमित्य विशेष लेख

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

आज 3 मार्च जगभर हा दिवस वन्यजीव दिन म्हणून साजरा करतात. या दिवशी वन्यप्राण्यांचे रक्षण, त्यांचे निसर्ग साखळीतले महत्त्व आदी विषयांवर अनेक जनजागृतीचे कार्यक्रम केले जातात. आणि हे काम अविरत करण्याचे काम वन विभाग करत असतो.

भारतीय संस्कृती मध्ये प्रत्येक जीवाला महत्व दिले आहे .त्याकाळच्या नाण्यांवर ही प्राण्याची, पक्षांची चित्रे पाहायला मिळतात. अलीकडच्या काळात भारतीय नोटेवर वन्य प्राण्यांचे चित्र ही पाहयाल मिळते. फक्त हत्ती, वाघ, सिंह म्हणजे वन्यजीव नव्हे तर निसर्गातील प्रत्येक घटक म्हणजे वन्यजीव आहे. ज्यावेळी  वन्यप्राणी आणि मानव ज्यावेळी संघर्ष होतो त्यावेळेसच आपल्या वन आधिकारी कर्मचारी आठवतात. मात्र हे वनकर्मी  अहोरात्र काम करत असतात.

पृथ्वीवरच्या प्रत्येक सजीवाला ऑक्सिजनची आवश्यकता असते. याकडे कोणी लक्ष देत नाही. मात्र वनविभाग दरवर्षी मोठ्या प्रमाणावर झाडे लावण्याचे त्याचे संगोपन करण्याचे काम करतो त्याच बरोबर जीवन साखळी मध्ये प्रत्येक सजीवाला महत्व आहे त्या वन्यजीवांचे संरक्षण करण्याचे काम वन विभाग करत असतो. तसेच वन जमिनीवर कोणी अतिक्रमण करू नये, वृक्ष तोड, वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात झालेल्या नुकसान भरपाई अश्या अनेक भूमिका वन विभाग बजावत असतो.

निसर्गाची साखळी टिकवायची असेल तर जगा आणि जगू द्या, कारण सर्व जीव जगले तरच मानवाचे अस्तित्व टिकेल असा मोलाचा संदेश या दिनाच्या निमित्ताने वन विभागाचे आधिकारी देत आहेत.