१०० कोटी हप्तेखोरीचा तपास पोहचला अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरात; तत्कालिन अधिकारी आणि डीसीपींची चौकशी सुरु

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहमदनगर, दि. २८ जुलै  : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिस उपनिरीक्षक सचिन वाझे यांच्याकडे १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंह यांनी पत्राद्वारे केला होता.

त्या पत्रात एसीपी संजय पाटील आणि उपायुक्त राजू भुजबळ यांच्या नावाचा उल्लेख होता. याचाच भाग म्हणून आता भुजबळ यांच्या संगमनेर तालुक्यातील आंबीखालसा गावातील भुजबळ यांच्या घरावर काल ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा घातला आहे.

मंगळवारी सकाळी साडेनऊ ते साडेबारा अशी तीन तास चौकशी त्यांनी केली असुन, परमबीर सिंह यांच्या पत्रात एसीपी संजय पाटील आणि उपायुक्त राजू भुजबळ यांची ४ मार्च २०२१ रोजी देशमुख यांच्या ज्ञानेश्वरी बंगल्यावर भेटल्याचा उल्लेख होता.

ईडीने देशमुख यांच्या घरावर छापा घातला होता. यातील पोलिस उपायुक्त भुजबळ हे मूळचे संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील आंबीखालसा येथील रहिवाशी आहेत. आंबी खालसा गावातील मंदिराच्या परिसरातीत शेतात असलेल्या घरावर दोन वाहनांतून आलेल्या ईडीच्या नऊ अधिकाऱ्यांनी छापा घातला. यावेळी घरात भुजबळ यांचे नातेवाईक उपस्थित होते.

हे देखील वाचा :

…या परिचारिकेने गमंत म्हणून काढला व्हीडीओ अन् हा व्हीडीओ समाज माध्यमावर झाला व्हायरल!

विषारी सापाशी खेळणे आले अंगलट; युवकाने गमावले प्राण

भामरागड- लाहेरी मार्गावर आढळले नक्षली पत्रके व बॅनर, नक्षल सप्ताह पाळण्याचे केले आवाहन

 

 

Anil Deshmukhlead storyparambirsingsachin Wajhe