…या परिचारिकेने गमंत म्हणून काढला व्हीडीओ अन् हा व्हीडीओ समाज माध्यमावर झाला व्हायरल!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर : पोलिसांची कोरोना टेस्ट करायला आलेल्या परिचारिकेचा पोलीस ठाण्याच्या अंगणातच चित्रित केलेला व्हीडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

जिवती तालुक्यातील पाटण येथील पोलीस ठाण्यात हा व्हिडीओ काढण्यात आला  आहे. ही परिचारिका या ठाण्यातील पोलिसांची कोरोना चाचणी करण्यासाठी आली होती. ती आटोपल्यावर बाहेर पडताना हा व्हीडीओ शूट करण्यात आलाय.

 

या व्हीडिओतील मुलगाही गावातीलच आहे. एक गंमत म्हणून हा व्हीडीओ काढला असला तरी तो चित्रित करण्याचं ठिकाण चुकीचं निवडल्यानं पोलिसांनी या दोघांनाही तंबी देऊन यापुढे असे कृत्य न करण्याची समज दिली. दोन दिवसांपूर्वी हा व्हीडीओ घेण्यात आला. आता व्हीडीओ समाज माध्यमावर चांगलाच गाजतोय.

हे देखील वाचा :

विषारी सापाशी खेळणे आले अंगलट; युवकाने गमावले प्राण

अबब! १२ फुटाची महाकाय मगर पकडली सांगलीवाडीत

भामरागड- लाहेरी मार्गावर आढळले नक्षली पत्रके व बॅनर, नक्षल सप्ताह पाळण्याचे केले आवाहन

Exclusive News : प्रसूतीच्या कळा अन् १५ किलोमीटरची पायपीट….

 

Chandrapurlead storypolice thane patanviral video