पालघर मधिल सुर्या नदी पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू

मनोर पोलीस घटनास्थळी दाखल, स्थानिकांच्या मदतीने दोघांचे मृतदेह शोधन्यास यश

लोकस्पर्श न्यूज़ नेटवर्क 

मनोज सातवी,पालघर, 27 एप्रिल – पालघर मधिल सुर्या नदी पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शोमेश साहेबराव शिंदे (वय १८ वर्षे) आणि करण चेतन नायक दोघेही बोईसर येथील रहिवासी आहेत. घटनेची माहिती मिळताच मनोर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, स्थानिकांच्या मदतीने दोघांचे मृतदेह शोधन्यास यश आले आहे. बोईसर पूर्वेच्या बोरशेती गावच्या हद्दीतील सुर्या नदी पात्रातील तिघे मित्र होण्यासाठी गेले होते. मात्र खोल पाण्याचा अंदाज मिळाल्यामुळे दोघेजण मोड आले तर एकाला वाचवण्यात यश आले.

बोईसर शहरातील दांडी पाडा भागातील तीन मित्र शनिवारी दुपारी अंघोळीसाठी बोरशेती गावच्या हद्दीतील सुर्या नदी पात्रात आले होते. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास बोरशेती गावच्या सुर्या नदिच्या पात्रात शोमेश साहेबराव शिंदे (वय.18) वर्षे. बिल्डींग नं. बी/२/१०३ दांडीपाडा आणि करण चेतन नायक (रा.दांडीपाडा) नदी पात्रात पोहत आसताना नदिच्या पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने वाहून गेले.

घटनास्थळी मनोर पोलीस, तारापूर औद्योगिक वसाहतीचे अग्निशामक दलाचे जवान, बोरशेती गावातील जिव रक्षक दलाच्या मदतीने नदी पात्रात शोध मोहीम राबविण्यात आली होती.शोध मोहिमे दरम्यान सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास दोन्ही मृतदेह सापडले.

दरम्यान, दोघांचेही मृतदेह मनोरे येथील सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले आहेत अशी माहिती मनोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश शिवलकर यांनी दिली.

Comments (0)
Add Comment