गर्भवती वनरक्षक महिलेसह पतीवरही लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

सातारा, दि. १९ जानेवारी : पळसवडे गावच्या माजी सरपंच रामचंद्र जानकर यांनी महिला वनरक्षक सिंधू सानप आणि त्यांचे पती सूर्याजी ठोंबरे यांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे..

धक्कादायक बाब म्हणजे ही वनरक्षक महिला ३ महिन्यांची गर्भवती असून त्यांच्या पोटात लाथा मारण्यात गेल्या आहेत तर डोक्यात दगड देखील मारल्याने त्या रक्तबंबाळ झाल्या आहेत..

मला न विचारता मजूर दुसरीकडे का नेले या कारणातून चिडून जाऊन वन समितीचे अध्यक्ष आणि पळसवडे गावचे माजी सरपंच रामचंद्र जानकर यांनी आणि त्यांची पत्नी प्रतिभा जानकर यांनी गर्भवती महिला वन रक्षक सानप यांना मारहाण केली आहे..
मारहाण करणाऱ्या सरपंचाविरोधात सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

या मारहाणीच्या घटनेने वन विभागात आणि जिल्ह्यात संताप व्यक्त केला आहे.

हे देखील वाचा : 

चायनीज नॉयलॉन मांजामुळे व्यक्तीचा गळा चिरला!

 

आदिवासी जिल्हयातील सामान्यांसाठी जास्तीत जास्त सुविधांची निर्मिती व्हावी- पालकमंत्री एकनाथ शिंदे

 

lead news