Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आकाशवाणीवर “शाळाबाहेरची शाळा” या मुलाखतीत प्राविण्य प्राप्त केल्याने स्वरा राऊत चा सत्कार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 
महाराष्ट्र शासनाच्या वतीने १ मे २०२० पासून “शाळाबाहेरची शाळा” या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या पालकांच्या मोबाईलवर शैक्षणिक संदेश (SMS) पाठविले जात आहे. आणि त्याविषयी विशेष सूचना आकाशवाणी केंद्रावरून केल्या जात आहे. त्यासाठी विद्यार्थ्यासोबत गप्पा गोष्टी देखील करता येणार आहे. थेट आकाशवाणीच्या नागपूरच्या ‘अ’ ( mw585 KHz/512.8 मी.) केंद्रावरून  दर मंगळवार, गुरुवार, शनिवार सकाळी १०.३५ वाजता  “शाळाबाहेरची शाळा”  हा कार्यक्रम प्रसारित होत असतो. (Pratham Maharashtra), या मोबाईल अॅप द्वारे झालेले भाग ऐकविण्यासाठी “शाळाबाहेरची शाळा” हा टॅब निवडून थेट प्रसारण ऐकण्यसाठी थेट रेडीओच प्रक्षेपण हा  टॅब निवडून ऐकण्यात येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या कार्यक्रमातून अभ्यासाची आवड निर्माण होऊन विकासात्मक पाऊल उचलण्यास मोठी मदत होत असल्याने या कार्यक्रमाचे सर्वत्र  कौतुक होत आहे. 

अहेरी, दि. १९ जानेवारी : “शाळेबाहेरची शाळा” या कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी ते वर्ग ८ च्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पाठविला जातो. त्या अभ्यासक्रमाचे प्रश्न, उत्तरे थेट ऑंनलाईन पद्धतीने आकाशवाणीवर विद्यार्थ्यांकडून घेतले जाते. त्यात प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांची निवड करून थेट प्रसारण आकाशवाणीवर करण्यात येते. या अंतर्गत नागेपल्ली अंगणवाडी क्र. २ मधील कु. स्वरा हंसराज राऊत हिने उत्कृष्ट मुलाखत दिल्याबद्दल तिचा अहेरी तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकाविल्याने तिचा सत्कार करण्यात आला आहे. 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

विभागीय आयुक्त कार्यालय,  नागपूर, प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूर, ‘प्रथम एजुकेशन फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने “शाळाबाहेरची शाळा” या कार्यक्रमाचे प्रसारण आकाशवाणीवर केल्या जात आहे. २३४ व्या भागासाठी नागपूर आकाशवाणीवर कु. स्वरा राऊत हिची निवड करून मुलाखत घेण्यात आली होती. यावेळी स्वरानी सर्व प्रश्नाची सडेतोड उत्तरे देऊन सर्वांचे मन जिंकून घेतले. या उत्कृष्ट मुलाखतीबद्दल अहेरी तालुक्यातील ग्रामस्थांच्या उपस्थितीत नागेपल्लीतील अंगणवाडी सेविका अर्पणा चुनारकर, अंगणवाडी पर्यवेक्षिका नुकुलवार मॅडम यांच्या हस्ते कु. स्वराचा व आई-वडिलांचा भेटवस्तू  देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, डायटचे प्राचार्य पाटील, जिल्हा शिक्षण अधिकारी (प्राथमिक) हेमलता परसा, अहेरी येथील महिला व बाल विकास अधिकारी हटकर, प्रथम संस्थेच्या सर्व डीआरपी यांचे मार्गदर्शक तसेच तालुक्यातील अंगणवाडी सेविका, कर्मचारी व ग्रामस्थांचे मोठे सहकार्य लाभले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

गर्भवती वनरक्षक महिलेसह पतीवरही लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण…

 

Comments are closed.