मोठी बातमी: स्वातंत्र्यदिनी गडचिरोली पोलिसांनी 258 देशी दारूच्या बॉक्ससह 28 लाखाचा मुद्देमाल केला जप्त अहेरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल ठाकूर यांची कारवाई

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली १५ ऑगस्ट : सहाचाकी वाहनातून देशी दारूची वाहतूक करीत असताना चामोर्शी तालुक्यातील अड्याळ नजीक देशी दारूच्या 258 बॉक्स सह 28 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई अहेरी चे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली झाली आहे.

 आज रविवारी 15ऑगस्टला पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ,एका सहाचाकी वाहनातून मोठ्या प्रमाणात दारूची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली त्यांनुसार अहेरी चे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांनी सापळा रचून  अड्याळ गावानजीक आज दुपारी सव्वा तीन च्या सुमारास  आयशर क्रमांक mh 21x 3960 वाहनाची तपासणी करण्यासाठी थांबविली असताना गाडीत बसलेले 5 ते 6 इसम पळून गेले गाडीची पोलिसांनी झडती घेतली असता त्यात चोरकप्प्यामध्ये दारू दडवून ठेवलेली दिसली. यामध्ये 90 एम.एल चे 258 देशी दारूचे बॉक्स एकूण 25800 निपा आढळून 18 लाख 6000 किंमतीचा माल आढळून आला.गाडी व देशी दारूचे 258 बॉक्स असा 28 लाख 6हजाराचा  मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी गाडीचा वाहनचालक खुशाब गंगाराम बोरकुटे याला पकडण्यात पोलिसांना यश आले.या मध्ये फरार आरोपीची नवे  विश्वजित ठाकूर,राजू ठाकूर,कुमरिष ठाकूर असीम ठाकूर असल्याची माहिती वाहानचालकाने पोलिसांना दिली आहे.

सदर अड्याळ हे गाव आष्टी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असून आष्टी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसेच पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी अहेरी चे अमोल ठाकूर व त्यांचे टीम करीत आहे.

 

 

gadchirolipoliceillegalleakearsmugling