धक्कादायक!! नाशिकच्या करन्सी नोट प्रेस मधून पाच लाखांच्या नोटांची चोरी!…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नाशिक : नाशिकच्या करन्सी नोट प्रेस मधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. नाशिकरोड परिसरात असलेल्या करन्सी नोट प्रेस मधून तब्बल पाच लाखांच्या नोटा चोरीला गेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी करन्सी प्रेस मधील कर्मचाऱ्यांची गोपनीय रित्या चौकशी सुरू आहे.

ही घटना दोन आठवड्यापूर्वी घडली असुन नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा नोंद करण्यासाठी मुद्रणालयातील अधिकाऱ्यांची मध्यरात्रीपर्यंत धावपळ सुरू होती.

काही वर्षपूर्वी घडलेल्या तेलगी घोटाळ्या नंतर पुन्हा एक मोठा  घोटाळा उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चौकशी अंती आणखी लाखो रुपये चोरी झाल्याचं तपासात समोर येऊ शकते.

नाशिकच्या करन्सी नोट प्रेस मध्ये ५००, २००, १०० च्या नोटांची छपाई केली जाते. याठिकाणी प्रेस मध्ये येण्या जाण्याआधी केंद्रीय सुरक्षा बलाकडून प्रत्येक कर्मचाऱ्यांची रोज कसून तपासणी केली जाते. तरी देखील ही चोरी झाल्याने सुरक्षा रक्षकांबद्दल संशय व्यक्त केला जात आहे. चोरी झालेल्या नोटांवर गव्हर्नरची सही प्रिंट झाली नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

हे देखील वाचा :

राज्यात डिसेंबरपूर्वी ५२०० जागांवर होणार पोलीस भरती – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची घोषणा

१९ वर्षीय तरुणाने दुचाकीसह तलावात उडी घेऊन केली आत्महत्या!

ब्रेकिंग : चंद्रपुरात बुरखा घालून एका युवकाने भरदिवसा केला गोळीबार

 

 

crimelead storynashik currency press