लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली दि, ११ : क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त नगर परीषद द्वारा संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरपरिषद डिजिटल उच्च प्राथमिक शाळा संकुल गडचिरोली येथे सामान्य ज्ञान स्पर्धाचे आयोजन करण्यात आले.
आधुनिक भारतातील समाज सुधारक ज्यांनी पुण्याला मुलींची पहिली शाळा सुरू केली ज्यांनी आपली पत्नी सावित्रीबाईला शिक्षण देऊन तिला समाजामध्ये शिकवण्यासाठी सुशिक्षित बनवले, आणि देशातील पहिली शिक्षिका असण्याचा मान प्रदान केला, समाजाचे दगड धोंडे आपल्या अंगावर घेत या राष्ट्राला शिक्षणाचे महत्त्व सांगितले, अशे थोर समाज सुधारक महात्मा जोतिबा फुले यांची आज जयंतीचे औचित् साधून वर्षभरात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित प्रश्नसंग्रह तयार करून विद्यार्थ्यांना त्याच प्रश्नावर आधारित १०० गुणांची ३ ते ५ आणि ६ ते ८ अशा दोन गटात स्पर्धा घेण्यात आली . दोन्ही गटात एकूण २०४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला .
या स्पर्धेत प्रथम गटात प्रथम क्रमांक आश्लेषा रतन सहारे , घनप्रिय भूषण नैताम , द्वितीय क्रमांक जन्नत कबीर निकुरे, तृतीय क्रमांक आदित्य विजय शेंडे तर दुसऱ्या गटात प्रथम क्रमांक तारका रंजन रामटेके ,द्वितीय क्रमांक इशिता प्रमोद जेट्टीवार ,तृतीय क्रमांक तेजस्विनी रामू गावडे या विद्यार्थ्यांनी पटकाविला. यशस्वी विद्यार्थ्यांना विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिवशी पहिल्या क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना स्कॉलर ऑफ द इयर अवॉर्ड देऊन गौरविण्यात येणार आहे.
या स्पर्धेचे पेपर नियोजन संध्या चिलमवार ,वंदना गेडाम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रेखा बोभाटे , सुजाता शेंडे , अनिल खेकारे, कोमल व मातनकर यांनी सहकार्य केले..