Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्त सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली दि, ११ : क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त नगर परीषद द्वारा  संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरपरिषद डिजिटल उच्च प्राथमिक शाळा संकुल गडचिरोली येथे  सामान्य ज्ञान स्पर्धाचे आयोजन  करण्यात आले.

आधुनिक भारतातील समाज सुधारक ज्यांनी पुण्याला मुलींची पहिली शाळा सुरू केली ज्यांनी आपली पत्नी सावित्रीबाईला शिक्षण देऊन तिला समाजामध्ये शिकवण्यासाठी सुशिक्षित बनवले, आणि देशातील पहिली शिक्षिका असण्याचा मान प्रदान केला, समाजाचे दगड धोंडे आपल्या अंगावर घेत या राष्ट्राला शिक्षणाचे महत्त्व सांगितले, अशे थोर समाज सुधारक महात्मा जोतिबा फुले यांची आज जयंतीचे औचित् साधून वर्षभरात  महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित प्रश्नसंग्रह तयार करून  विद्यार्थ्यांना त्याच प्रश्नावर  आधारित १०० गुणांची ३ ते ५ आणि  ६ ते ८ अशा दोन गटात स्पर्धा घेण्यात आली . दोन्ही गटात एकूण २०४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला .

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या स्पर्धेत प्रथम गटात प्रथम क्रमांक आश्लेषा रतन सहारे , घनप्रिय भूषण नैताम , द्वितीय क्रमांक जन्नत कबीर निकुरे, तृतीय क्रमांक आदित्य विजय शेंडे तर दुसऱ्या गटात प्रथम क्रमांक तारका रंजन रामटेके ,द्वितीय क्रमांक इशिता प्रमोद जेट्टीवार ,तृतीय क्रमांक तेजस्विनी रामू गावडे या विद्यार्थ्यांनी पटकाविला. यशस्वी विद्यार्थ्यांना विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिवशी पहिल्या क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना स्कॉलर ऑफ द इयर अवॉर्ड देऊन गौरविण्यात येणार आहे. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती मंगला रामटेके यांनी महात्मा फुले यांच्या जीवन कार्यावर मार्गदर्शन करताना महात्मा फुले यांनी  “प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात, ज्यांना कुठलेतरी ध्येय गाठायचे असते.” असे म्हणणाऱ्या ज्योतीबांनी २४ सप्टेंबर १८७३ रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे, हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली तेव्हा स्त्री विभागाचे नेतृत्व सावित्रीबाई यांनी केले. सावित्रीबाई यांच्याबरोबर १९ स्त्रियांनी सत्यशोधक समाजाचे कार्य सुरू केले. महाराष्ट्रातील तळागाळापर्यंत ही चळवळ पोहोचली. छत्रपती शाहू महाराजांनी सत्यशोधक चळवळीस पाठिंबा दिला. ‘सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥’ हे या समाजाचे घोषवाक्य होते. सत्यशोधक समाजाने गुलामगिरीविरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली.या मोलाच्या कामगीरीची माहिती दिली .

या स्पर्धेचे पेपर नियोजन संध्या चिलमवार ,वंदना गेडाम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रेखा बोभाटे , सुजाता शेंडे , अनिल खेकारे, कोमल व मातनकर  यांनी सहकार्य केले..

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.