Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

महात्मा फुले जयंती निमित्त वाङमय पुरस्कार प्रदान सोहळा पुणे

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

पुणे, 11 एप्रिल :-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासन, विद्यार्थी विकास मंडळ मातंग साहित्य परिषद आणि समरसता साहित्य परिषद यांचे संयुक्त विद्यमाने आद्यक्षमाजसुधारक महात्मा फुले जयंती दिनानिमित्त आज पुण्यातील संत ज्ञानेश्वर सभागृह, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे पद्मश्री भिकुजीदादा इदाते, पद्मश्री रमेश पतंगे, पद्मश्री डॉ. प्रभाकर मांडे यांना मा. डॉ. कारभारी काळे कुलगुरु सावित्रीबाई फुले विद्यापीठ यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वाङमय पुरस्कार प्रदान करण्यात आले.

वाङमय पुरस्कारचे यंदाचे 5 वे वर्ष आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या वेळी विशेष उपस्थिती मध्ये मा. आमदार सुनील कांबळे, ( पुणे कॅन्टोंमेंट विधानसभा मतदारसंघ ) मा. प्राचार्य अनिरुद्ध देशपांडे , ( पुणे विद्यापीठ ),डॉ. संजीव सोनवणे ,डॉ. प्रफुल्ल पवार कुलसचिव प्र-कुलगुरू रविंद्र शिंगणापूरकर,डॉ. धनंजय भिसे अध्यक्ष, ( मातंग साहित्य परिषद ) डॉ. प्रसन्न पाटील कार्यवाह, डॉ. सुनील भंडग ,डॉ. संतोष परचुरे आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.

या वेळी पद्मश्री पुरस्कार नी सन्मानित असलेले भिकुजीदादा इदाते यांनी आपले मनोगतात म्हणाले – महापुरुष युग परिवर्तनाचे नांदी देत असतात. अण्णाभाऊ साठे यांनी ज्या कादंबरया लिहल्या या जीवनाला दिशा देणाऱ्या आहेत. त्याचे विचार आज सुद्धा आपल्याला नवीन दिशा देण्याचे काम करतात जात पात चे राजकारण न करता सर्वांनी एकत्र आले पाहीजे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

कार्यक्रमाचे अध्यक्ष कुलगुरु डॉ. कारभरी काळे -लोकांनी शिक्षण घेतले पाहिजे. समाजातिल जाती भेद दूर होतिल तेव्हा लोक शिक्षित होतील.शिक्षण हे प्रभावशील अस्त्र आहे. शिक्षणामुळे लोकाच्या विचारा मधे फरक पडतो. महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजात शिक्षण बद्दल एक नवी सुरुवात केली.. त्या काळी शिक्षण बद्दल जनजागृती आणि क्रांती आणली.

हे पण वाचा :-

Comments are closed.