Filmfare Awards 2021: इरफान खान आणि तापसी पन्नू सर्वोत्कृष्ट कलाकार

शनिवारी 66 व्या फिल्मफेअर पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. 

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क 28 मार्च:- 66 व्या फिल्मफेअर पुरस्कार 2021 ची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. हा बॉलिवूडचा सर्वात मोठा पुरस्कार मानला जातो. कलाकार किंवा चाहतेच नव्हे, तर चित्रपटांचे दिग्दर्शक, गायक यासह चित्रपटांची संपूर्ण टीम या पुरस्काराची आतुरतेने वाट पाहात असतात. शनिवारी (27 मार्च) संध्याकाळी उशिरा 66 व्या फिल्मफेअर पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.

सर्वोत्कृष्ट अभिनेता: मुख्य भूमिकेसाठी – इरफान खान, चित्रपट – अंग्रेजी मीडियम

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: मुख्य भूमिकेसाठी- तापसी पन्नू, चित्रपट- थप्पड

सर्वोत्कृष्ट चित्रपट: थप्पड

सर्वोत्कृष्ट अॅक्शन: तान्हाजी: द अनसंग वॉरीयर: रमजान बुलुट, आरपी यादव

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक: ओम राऊत, चित्रपट- तानाजी: द अनसंग वॉरियर

सर्वोत्कृष्ट अभिनेता (क्रिटीक्स): अमिताभ बच्चन, चित्रपट- गुलाबो-सीताबो

सर्वोत्कृष्ट संवादः जूही चतुर्वेदी, चित्रपट- गुलाबो-सीताबो

सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफीः फराह खान, चित्रपट- दिल बेचारा

सर्वोत्कृष्ट चित्रपट (क्रिटीक्स):  ईब अलाय ऊ!, दिग्दर्शक – प्रतिक वत्स

सर्वोत्कृष्ट प्लेबॅक गायक (पुरुष): राघव चैतन्य, चित्रपट- थप्पड, गाणं- ‘एक टुकडा धुप’

सर्वोत्कृष्ट प्लेबॅक गायक (महिला): ‘मलंग’ टायटल ट्रॅक – असीस कौर

सर्वोत्कृष्ट बॅकग्राऊंड स्कोअर: मंगेश उर्मिला धाकड, चित्रपट -थप्पड

सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी: अविक मुखोपाध्याय, चित्रपट- गुलाबो सीताबो

सर्वोत्कृष्ट कॉस्ट्यूम डिझाइनः वीरा कपुरी, चित्रपट- गुलाबो सीताबो

सर्वोत्कृष्ट संपादन: यशा पुष्पा रामचंदानी, चित्रपट- थप्पड

सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाइन: मानसी ध्रुव मेहता, चित्रपट- गुलाबो सीताबो

सर्वोत्कृष्ट साऊंड डिझाइन: कामोद खराडे, चित्रपट- थप्पड

सर्वोत्कृष्ट व्हीएफएक्स: प्रसाद सुतार, चित्रपट- तान्हाजी: द अनसंग वॉरीय

सर्वोत्कृष्ट म्युझिक अल्बम: प्रीतम, चित्रपट -लुडो