टिव्ही, रिमोट सोडा; देश जोडा….. सोनू सूदचं नवं आवाहन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई, 22 एप्रिल:-देशभरात सध्या कोरोनाची स्थिती  बिकट होत चालली आहे. दिवसेन् दिवस कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. अभिनेता सोनू सूद जो या कठीण काळात लोकांची गेल्या वर्षभरापासून मदत करत होता त्यालाही कोरोनाची लागण झाली आहे. पण तरीही सोनूचं मदतकार्य सुरूच आहे. नुकतच सोनूने एक नव ट्विट केलं आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा तो चर्चेत आला आहे.

ट्विट मध्ये त्याने लिहिलं आहे, ‘टिव्ही रिमोट सोडा, देश जोडा. दुसऱ्यांचे प्राण वाचवाल तरच जगू शकाल’. सध्या लॉकडाउन सुरू असल्याने लोक घरातच आहेत व दिवसरात्र टिव्ही, बातम्या पाहत आहेत. तर याशिवाय दुसरा काही पर्याय देखिल नाही. त्यामुळे सोनूने चाहत्यांना हा सल्ला दिला आहे. सोनू कोरोना संक्रमित (Sonu tested positive)  झाला असला तरीही त्याचं मदत कार्य सुरूच आहे.

covidhelp for everonesonu sood